टाकेवाडी ठरली “वॉटर कप 2018’ची मानकरी

पुणे – लोक सहभागातून उभारलेली जलसंधारणाची चळवळ राज्यातील चार हजार गावांमध्ये पोहोचली आहे. या चळवळीला आणखी वेग देण्याच्या हेतुने पानी फाउंडेशनतर्फे आयोजित “वॉटर कप 2018′ या स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यंदा या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील टाकेवाडी (आंधळी) या गावाने बाजी मारली आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि 75 लाख रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित “वॉटर कप 2018′ या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (दि.12) झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अभिनेता आमिर खान, किरण राव आणि सत्यजीत भटकळ उपस्थित होते. स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील भांडवली आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावांना विभागून द्वितीय तर बीड जिल्ह्यातील आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातील उमठा गावांना विभागून तृतीय पारितोषिक मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फडणवीस म्हणाले, “ज्या गतीने पाणी फाउंडेशनचे काम होत आहे. त्यातून नक्कीच राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल. यंदा 75 तालुके दुष्काळमुक्त केलेत, आगामी काळात 100 तालुके दुष्काळ मुक्त करण्याचा आमचा मानस आहे. तसेच, जलसंधारणचे काम करताना भूतकाळातील चुका टाळून योग्य पीकपद्धत राबविण्याकडे लक्ष देणार आहे.’

आमिर म्हणाला, “तीन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनचा जन्म झाला, तोच मुळी राज्याला दुष्काळमुक्त करायचा. हे केवळ काही मोजक्‍या व्यक्तींचे नव्हे तर राज्यात राहणाऱ्या कोटी लोकांचे आहे. हे स्वप्न पूर्ण करणे हे केवळ सरकारचे किंवा कुठल्यातरी संस्थेचे काम नाही. ते जनसागराचे काम आहे. जसजसा हा जनसागर वाढेल तसतसे हे स्वप्न पूर्ण होईल. परंतु, हे स्वप्न पाहताना मला नेहमी वाटतं की हे स्वप्न खरचं पूर्ण होईल का? खरंच राज्य एक दिवस पाणीदार होईल? याचं उत्तर आतातरी माझ्याकडे नाही पण या स्वप्नपूर्तीच्या प्रवासातील प्रत्येक क्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी या प्रवासाला नव्हे तर हा प्रवास मला पूर्ण करत आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)