डाटा प्रायव्हसी हक्काची योग्य ती काळजी घेऊ – सुरेश प्रभु

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – नागरीकांच्या डाटा प्रायव्हसीच्या बाबतीत सरकार योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करील तसेच चांगल्या प्रशासनासाठी सरकार आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून प्रशासकीय कार्यक्षमता अधिक सुधारेल असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी केले आहे. ते म्हणाले की भारतात आज अमेरिका आणि चीन पेक्षाही मोठ्या प्रमाणात डाटा वापरला जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या संबंधात आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की डिजीटल डाटाच्या संबंधात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कायदे आणि नियमांची चौकट अधिक मजबूत करीत आहे. आज आर्टिफिशल इंटेलिजन्स हे कळीचे तंत्रज्ञान बनले असून यात तो प्राविण्य मिळवेल तो जगावर राज्य करील अशी याबाबतची स्थिती आहे. आज जगातील प्रत्येक देश आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या संबंधातील धोरण ठरवत आहे. भारतही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले. आज भारतातील सुमारे 50 कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)