राम मंदिराच्या मुद्यावर देशात सार्वमत घ्या! : प्रकाश आंबेडकर

शिवसेना दुतोंडी सापासारखी 

मुंबई – शिवसेना ही दुतोंडी सापासारखी असल्याची टीका करतानाच अयोध्येत राम मंदिराच्या मुद्दयावर केंद्र सरकारने देशात सार्वमत घ्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर टीकास्त्र सोडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आता मंदिराचा मुद्दा काढत आहे. शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे. बोलते एक आणि करते एक. पण लोकांना आता मूर्ख बनविता येणार नाही. उद्धव ठाकरे यांनी राममंदिर बांधायला मुंबईतूनच विटा घेउन जाव्यात असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपा आणि संघाविरोधात आनचा लढा 
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. भाजपा आणि रा.स्व.संघाविरोधात आम्ही लढा उभा केला आहे. त्यात आता कोणतीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट करतानाच संघाच्या मागणीनुसार राम मंदिरासाठी जमिन संपादित करण्यासाठी अध्यादेश काढता येणार नाही असेही ते म्हणाले.

केंद्राच्या धोरणामुळे देश संकटात 
केंद्राच्या आर्थिक धोरणांमुळे देश संकटात सापडला आहे अशी टिका करतानाच बॅंका आता कर्ज देण्याच्या परिस्थितीत नाहीत. या आर्थिक प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक किंवा पाकिस्तानसोबत छोटीशी चकमक घडविण्यात येउ शकते असे भाकितही प्रकाश आंबेडकर यांनी केले. नोटाबंदीनंतर गृहनिर्माण क्षेत्र मोठ्या संकटात सापडले असून या क्षेत्राशी 56 लाख लोक निगडित आहेत. हे क्षेत्र पुढील 15 वर्षे तरी पुन्हा उभे राहू शकत नाही असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)