पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणा

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची मागणी

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री राज्यातील भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असून या राज्यात कायद्याचे राज्य उरलेले नाहीं त्यामुळे तेथील तृणमुलचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री व राज्यातील लोकसभेचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करून राजकीय नाटक करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला. आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी हा आरोप केला आहे. सुप्रियो हे अवजड उद्योग खात्याचे राज्यमंत्री असून ते पहिल्यादांच पश्‍चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून आले आहेत.

त्यांनी म्हटले आहे की चीटफंड घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचे 35 हजार कोटी रूपये लुटले गेले आहेत आणि या प्रकरणातील भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांवर सीबीआयची कारवाई सुरू केल्यानंतर त्याच्या विरोधात देशातील प्रमुख राजकीय विरोधी पक्षही जो हल्लागुल्ला करीत आहेत तो लाजीरवाणा आहे. या घोटाळ्यात तृणमुल कॉंग्रेस नेत्यांचाच हात आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)