नोटा द्या, चिल्लर घ्या

20 लाखांची चिल्लर रोकड, डेपोस्तरावरुन वाटप

पुणे – पीएमपीच्या तिकीट विक्रीतून जमा होणारी चिल्लर रोकड स्वीकारण्यास बॅंकेने नकार दिला असून महिनाभरापासून यावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे आता चिल्लर कमी करण्यासाठी पीएमपीनेच प्रयत्न सुरू केले असून डेपो स्तरावरुन नोटांच्या बदल्यात चिल्लर पैसे बदलून देण्यात येत आहेत. अशाप्रकारे आजवर 7 लाख रुपये बदलून दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पीएमपीकडे दैनंदिन जवळपास दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर रोज जमा होते. ती पुणे कॅम्प येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखेत जमा केली जाते. मात्र, बॅंकेने दि.4 ऑक्‍टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. रिझर्व्ह बॅंकेचा दाखला देत विशिष्ट मर्यादेपर्यंतच रक्कम स्वीकारली जाणार असल्याचे बॅंकेने सांगितले आहे. यामुळे पीएमपी प्रशासनासमोर चिल्लर पैशांचे संकट उभे असून महिनाभरात 20 लाखांची चिल्लर रक्कम जमा झाली आहे. ती कमी करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पीएमपीकडून डेपो स्तरावर सुट्ट्या पैशांची गरज असलेल्यांना नोटांच्या बदल्यात सुट्टेै पैसे देण्यात येत आहेत. यामुळे जमा होणाऱ्या चिल्लर रकमेत फरक पडला असून दैनंदिन दीड लाखांच्या सुमारास जमा होणारी चिल्लर एक लाखापर्यंत कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

बॅंकेचा सकारात्मक प्रतिसाद
गेल्या महिनाभरापासून बॅंकेने रक्कम स्वीकारणे बंद केले आहे. यावर पीएमपी प्रशासनाकडून बॅंक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासासाठी प्रयत्न सुुरू आहेत. मात्र, यावर येत्या आठवडाभरात तोडगा निघेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)