पुणे – निबंधक कार्यालयासंबंधीत तक्रारींची तातडीने दखल घ्या

राज्य शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जिल्हापातळीवरील सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधक कार्यालयांच्या आपले सरकार पोर्टलवर आलेल्या तक्रारी दखल, तसेच या तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घ्यावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर नागरिकांनी शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह जिल्हा निबंधक किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाविषयी काही तक्रारी किंवा सूचना असल्याचे संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालय या तक्रारी संबधित जिल्हा निबंधक यांच्याकडे वर्ग करतात. जिल्हा निबंधक यांच्याकडून तक्रारींचे निराकरण केले जाते.

जर जिल्हा निबंधक यांनी एखाद्या तक्रारीवर मुदतीमध्ये कार्यवाही केली नाही किंवा सह जिल्हा निबंधक यांनी केलेली कार्यवाही वा घेतलेला निर्णय संबधित तक्रारदार, सूचनाकर्ता यांच्या दृष्टीने समाधानकारक नसेल तर अशा तक्रार व सूचनेवर वरिष्ठ दर्जाच्या त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना शासनाने वरील सूचना दिलेल्या आहेत.

जिल्हा निबंधक यांनी जर मुदतीत कार्यवाही केली नाही, अथवा त्यांनी केलेल्या कार्यवाहीने समाधान न झाल्याचे संबंधित तक्रारदार यांनी लेखी दिल्यास अशा तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी व आवश्‍यक ती कार्यवाही करून तक्रारदारास माहिती कळवावी, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)