तैवान भारतातील गुंतवणूक वाढविणार

पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारणीसाठी मदत 
नवी दिल्ली: तैवानकडून येत्या काळात 6.6 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक करण्यात येणार आहे. हि गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्याकता करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ओडीसा येथे तेल साठवण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून हे काम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण तेल मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिले आहे.
हा प्रकल्प उभारण्यात आल्या नंतर तेल शुद्धीकरण करण्यात येऊन यात एका वर्षाला 15 दशलक्ष तेल शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची क्षमता या प्रकल्पामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. पर्यवरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून यांची रचना करण्यात येणार आहे. अशा मुद्यांवर चर्चा यावेळी करण्यात आली. ही गुंतवणुक भारतासाठी योग्य असल्याचे मत या दरम्यान अधिकाऱयांकडून मांडण्यात आले.
भारतात तैवानकडून करण्यात गुंतवणूक आणि नवीन योजना यावर चर्चा करण्यात घडवून आणली. तैवानमधील सीपीसी या तेल क्षेत्राशी कार्यरत असणाऱया कंपनीशी तैवान अध्यक्ष भारतीय अधिकारी यांच्यात भविष्यातील वाटचाल सकारात्मक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ट्‌वीट करुन प्रधान यांनी या गुंतवणूकीला पुष्टी दिली.
तैवान इलेक्‍ट्रॉनिक आणि मोबाईल उत्पादनात जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. तैवानमधील या क्षेत्रात सक्रिय असलेल्या कंपन्या भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याच्या शक्‍यतेवर गेल्या काही वर्षापासून विचार करीत आहेत. याबाबत या कंपन्यांची भारतातील काही राज्यांच्या सरकारबरोबर बोलणी चालू आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास संधी असल्याचे बोलले जाते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)