तैवानने शांतिपूर्ण मार्गाने चीनमध्ये सामील व्हावे -शी जिनपिंग

बीजिंग (चीन): तैवानने शांतिपूर्ण मार्गाने चीनमध्ये सामील व्हावे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज म्हटले आहे. तैवानचे शांतिपूर्ण मार्गाने चीनमध्ये विलीनीकरण होत नसेल, तर लष्करी सामर्थ्याचा वापर केला जाणारच नाही, अशी खात्री देता येणार नाही, त्यासाठी सर्व पर्याय खुले असतील. मात्र तैवानचे चीनमध्ये विलिनीकरण ही अटळ गोष्ट आहे, अशी टिप्पणी शी जिनपिंग यांनी जोडली आहे.

शी जिनपिंग हे ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे तैवान पॉलिसीच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे एक दिवास्वप्न आहे असे त्यांनी सांगितले. तैवानच्या विलिनीकरणासाठी सर्व पर्याय खुले आहेत. मात्र फुटीर वृत्तीला आणि धोका देण्याला आमच्याकडे अजिबात थारा नाही. या कामाला विरोध करणाऱ्या वा अड्‌चणी निर्माण्‌ करणाऱ्या तत्त्वांवरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)