12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: Team India

विश्‍वचषकासाठीचा संघ तयार – विराट कोहली

एका स्थानासाठी पर्याय शोधने आवश्‍यक नवी दिल्ली - विश्‍वचषका पुर्वीची अखेरची मालिका भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-2 अशा फरकाने गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील खराब कामगिरीचे खापर कोणत्याही एका खेळाडू अथवा खेळपट्टीवर न फोडता या मालिकेत विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पात्र होता असे विधान केले...

अजिंक्‍य रहाणेला परत आणा – नेटिझन्सची मागणी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-2 अशी गमावली. मालिकेच्या सुरुवातीला भारत 2-0 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर मात्र सलग तीन सामने भारताने गमावले आणि मालिका ऑस्ट्रेलियाने खेचून नेली. या मालिकेत भारताच्या फलंदाजीवर बरेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशा केली. प्रामुख्याने मधल्या फळीतील...

विश्‍वचषक स्पर्धा डोळ्यासमोर नाही – विजय शंकर

नागपुर - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या विजय शंकरणे विश्‍वचषकासाठी संघात स्थान मिळेल की नाही या बद्दल मी सध्या विचार करत नसल्याचे सामन्यानंतर बोलताना सांगितले. यावेळी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकरने अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाचा डाव...

खेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद

मुंबई - विश्‍वचषक स्पर्धा आणि आयपीएल स्पर्धा यांच्या मधिल वेळापत्रक आणि त्यामुळे खेळाडूंवर येणारा ताण लक्षात घेऊन आयपीएलमध्ये संभाव्य खेळाडूंचा वापर हा रोटेशन पद्धती नुसार केला जाणार असून अशा पद्धतीमुळे विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना कोणताही ताण जानवणार नाही. असे प्रतिपादन निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद...

#INDvAUS : आगामी ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या टी20, वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुणे – भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावरून परतला असून विश्‍वचषकापूर्वी आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारताचा दौरा करणार आहे. भारतीय संघाला देखील विश्‍वचषकापूर्वी आपल्या संघासाठी उपयुक्‍त अशा अंतिम 15 खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20...

निराशाजनक पराभवातून खूप काही शिकायला मिळाले – रोहित शर्मा

तिसऱ्या सामन्यानंतर रोहित शर्माने व्यक्‍त केली भावना हॅमिल्टन  -भारतीय संघाने तिसरा टी-20 सामना केवळ 4 धावांनी गमावल्याने भारताला मालिकाही 2-1 अशा फरकाने गमावावी लागली. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये पहिली टी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. मात्र, पराभवातून भरपूर शिकायला मिळाले अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार रोहित...

#INDvAUS : आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्‍ट्रेलियन संघाची घोषणा

पुणे - ऑस्‍ट्रेलियाने आगामी भारत दौऱ्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्‍ट्रेलिया भारतीय दौऱ्यात 2 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 24 फेब्रुवारीपासून बेंगलुरू येथे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याने होणार आहे. ऑस्‍ट्रेलियाच्या संघात वेगवान गोलंदाज मिचेल स्टाॅर्क याचा संघात समावेश...

फिफा क्रमवारीत भारतीय संघाची घसरण

पहिल्या 100 संघातून बाहेर नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या 2019 साठीच्या पुरुष संघाच्या क्रमवारीत भारताची 6 अंकांनी घसरण झाली असून त्यामुळे भारत पहिल्या 100 संघाच्या यादीतून बाहेर पडला आहे. मागच्या दोन वर्षात भारतीय संघाने आपल्या क्रमवारीत सुधारणा...

#CWC19 : भारतीय संघ विश्वकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार – रिचर्डसन

नवी दिल्ली - भारतीय संघाचा डाव न्यूझीलंडविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यात 92 धावांवरच आटोपला, त्यानंतर काही वेळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी भारतीय संघ हा 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वकपमध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. गुरूवारी आयसीसी आणि कोकाकोला यांच्यात पाच...

#NZvIND : भारताला मालिकेत वर्चस्वाची संधी

सामन्याची वेळ : सकाळी 7.30 पासून स्थळ : द बे ओव्हल (माउंट मोंगानुई) माउंट मोंगानुई - भारतीय संघ सध्या न्युझीलंडच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघांदरम्यान आजपासून (दि. 28) तिसरा एकदिवसीय सामना रंगणार असून पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ 2-0ने आघाडीवर आहे. आजच्या...

भारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. या विजयासोबत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा अपवाद वगळता सर्व संघाना एकदिवसीय मालिकेत त्यांच्यात देशात हरवण्याचा पराक्रम केला आहे. 1990 साली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आपला पहिला एकदिवसीय मालिका विजय मिळवला होता....

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा आशियातील भारत हा एकमेव संघ

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकताना सोमवारी इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला 72 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. 1947 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका खेळली होती. मात्र, एकदाही भारताला कसोटी मालिका विजय मिळवता आला...

#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : भारताची दमदार विजयी सलामी

भुवनेश्वर - भारतीय हाॅकी संघाने हाॅकी विश्वचषकाची सुरूवात दमदार केली आहे. भारतीय संघाने हाॅकी विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा 5-0 ने पराभव करत दमदार विजयी सलामी दिली आहे. भारताीय संघाकडून सिमरनजित सिंगने 43 आणि 43 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. मनदीप सिंगने 10...

#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर

नवी दिल्ली - भारतीय संघ आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 टी-20 सामन्यांनी करणार आहे. त्यानंतर चार कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दोन महिन्यांच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील आपल्या पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम 12 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या 12 सदस्यीय...

हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली - 28 नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर येथे सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली असून या 18 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व मनप्रीत सिंहकडे सोपवण्यात आलेले असून, या संघात अनुभवी ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि आघाडीच्या फळीतला खेळाडू एस.व्ही.सुनिल यांना वगळण्यात आले...

महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताचे विजयाचे अर्धशतक

हरमनप्रीत कौरची शतकी खेळी आणि तिला जेमीमा रॉड्रीक्‍झने दिलेल्या साथीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिलासंघाने न्युझीलंडच्या संघाचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेत विश्‍वचषक टी-20 स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताने विजयाचे अर्धशतक साजरे केले आहे. भारताने एकूण...

महिला टी20 विश्‍वचषक स्पर्धा 2018 : भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

प्रोव्हिडन्स - हरमनप्रीत कौरची शतकी खेळी आणि तिला जेमीमा रॉड्रीक्‍झने दिलेल्या साथीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिलासंघाने न्युझीलंडच्या संघाचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेत विश्‍वचषक टी-20 स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली आहे. https://twitter.com/BCCIWomen/status/1060957439565139968 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद...

ICC Women’s World T20 : जाणून घ्या.. भारतीय महिला संघाचे सामन्याचे वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वेस्टइंडीजमध्ये 9 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान वेस्टइंडीजमध्ये आयसीसी टी20 विश्वचषक खेळणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 9 नोव्हेंबर गयाना मध्ये न्यूझीलंड विरूध्द खेळणार आहे. भारतीय संघाचा ग्रूप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतासह आॅस्ट्रेलिया,...

क्रीडांगण : “ऑल इज (नॉट) वेल’ 

नितीन कुलकर्णी  क्रिकेटसारख्या खेळामध्ये मिळवलेले यश हे नेहमीच सांघिक मानले जाते. यासाठी संघामध्ये एकजूट आणि समन्वय असणे आवश्‍यक असते. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती कर्णधाराची आणि प्रशिक्षकांची. किरकोळ स्वरूपाच्या कुरबुरी या चालतच असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. कारण संघातील खेळाडूंमधील अंतर्गत धुसफूस...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत

केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या नवीन निर्देशांनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच (बीसीसीआय) हे माहितीच्या अधिकाराच्या कार्यकक्षेत येत आहे. त्यामुळे बीसीसीआय हे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास बंधनकरार असेल. भारतातातील क्रिकेटची सर्वोसर्वा बीसीसीआय ही स्वीकृत संस्था आहे. क्रीडा मंत्रालय, केंद्रीय सूचना अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि...

ठळक बातमी

Top News

Recent News