12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: sports

IPL2019 : आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई -भारतीय क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या 2 आठवड्यांचे वेळापत्रक या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या मोसमाचे उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार...

प्रजनेशची क्रमवारीत 84 व्या स्थानी झेप

नवी दिल्ली - इंडियन वेल्स स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्‍वरनच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम 84 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर, दुसरीकडे दुखापतीमुळे कोर्टबाहेर असलेल्या युकी भांबरीच्या क्रमवारीत घसरण होत असून तो अव्वल 200 जणांच्या यादीतून बाहेर...

पेनल्टी शुटआऊट टाळल्याचा आनंद – कार्लेस कुआद्रात

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा मुंबई - पेनल्टी म्हणजे बऱ्याच वेळा लॉटरी असते. त्यामुळे आम्हाला शूटआऊट टाळायचा होता. त्याचदृष्टिने आमचा प्रयत्न होता. एक चेंडू नेटमध्ये जाऊन गोल झाला आणि आम्ही जिंकलो याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया हिरो इंडियन सुपर लीग (आयएसल) विजेत्या बेंगळुरू एफसीचे प्रशिक्षक...

क्रिकेट : पाकिस्तानकडून 11 कोटींची भरपाई

नवी दिल्ली - क्रिकेट मालिका आयोजित न करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) कायदेशीर लढाई लढणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दणका दिला होता. त्याची नुकसानभरपाई म्हणून 11 कोटी रुपये पीसीबीने बीसीसीआयकडे सुपूर्द केले आहेत, असा दावा पीसीबीने केला आहे. पीसीबीने आयसीसीच्या क्रीडा...

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : डॉमनिक थिएमला इंडियन वेल्सचे विजेतेपद

अंतिम सामन्यात फेडररचा केला पराभव इंडियन वेल्स - कारकीर्दीत आतापर्यंत पाच वेळा इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडररला सोमवारी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीएमने फेडररला 3-6, 6-3, 7-5 असे पराभूत करत त्याचे विक्रमी सहाव्या जेतेपदाचे स्वप्न धूळीस...

विश्‍वचषकाच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही – रिचर्डसन

लंडन- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या वतीने 30 मे ते 14 जुलै या कालावधीत विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र, न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्व जगाला धक्‍का बसला असून विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी...

मेस्सीच्या हॅट्रीकने बार्सिलोनाचा सहज विजय

नवी दिल्ली  - ला लिगा फुटबॉलमध्ये मेसीच्या हॅट्‌ट्रीकमुळे बार्सिलोनाने रेयाल बेटिसवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल लीगच्या सलग दुसऱ्या विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे. 28 सामन्यांतून 20 विजय, दोन पराजय आणि सहा बरोबरींसह त्यांचे एकूण 66 गुण झाले...

एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टींग स्पर्धा : पुण्याच्या गौरव घुले यांना सुवर्णपदक

पुणे  - ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पुण्याच्या गौरव घुले यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. महिला गटात पुण्याच्या रोहिणी बन्सलने सुवर्णपदक आणि दिपा लुंकड हिने रोप्य पदक मिळविले. गौरव ने 93 किलो वजनी गटात डेडलिफ्ट मध्ये 285 किलो, स्क्वॉट मध्ये 235 किलो, बेंचप्रेस मध्ये...

बॅडमिंटन स्पर्धा : नागेश पालकर-अभिषेक कुलकर्णी जोडीला विजेतेपद

आंतर कार्यालय बॅडमिंटन स्पर्धा पुणे  - नागेश पालकर - अभिषेक कुलकर्णी यांच्या जोडीने सचिन मानकरके - अनिकेत यांच्या जोडीला पराभूत करताना आंतर कार्यालय बॅडमिंटन स्पर्धेतील दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. तर, एकेरीच्या गटात केदार टंकसाळेने निलेश गोरेला पराभूत करताना विजेतेपद पटकावले. शिवाजीनगर येथील पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स हॉल...

स्नुकर स्पर्धा : खार जिमखाना संघाचा सलग तिसरा विजय

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धा पुणे - पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत खार जिमखाना संघाने अनुक्रमे फायर बॉल व क्‍यू क्‍लब किलर्स या संघांचा पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील...

चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायडू योग्य – हेडन

नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्‍वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने अंबाती रायडू हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत मांडले...

बहुप्रतीक्षित IPL2019 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

भारतातील बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धा IPL2019 इंडियन प्रीमियर लीग २३ मार्च पासून सुरु होणार आहे. यंदा देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे IPL2019 चे सामने देशाबाहेर खेळवण्याचा विचार होता, मात्र ही स्पर्धा देशातच घेण्याचे एकमत झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, तर उर्वरित...

ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा - येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सोमवारचा दिवस गाजवला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यावेळी त्याने 8 मिनिटे 28.94 सेकंदाच्या वेळेची नोंद करताना स्वतःच्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि चीनमध्ये होणाऱ्या...

जिनोआविरुद्ध रोनाल्डोला विश्रांती देणार

नवी दिल्ली -चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचे द्वार युवेंटसला उघडून देण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे जिनोआविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला विश्रांती देण्यात आली आहे. युवेंटसला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीची संधी उपलब्ध झाली असल्याने या कमी महत्त्वाच्या सामन्यात त्याला खेळवणे धोक्‍याचे नसल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय...

आशियाई स्पर्धेत बुद्धिबळाचे पुनरागमन

नवी दिल्ली - हॅंगझोऊ येथे 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ क्रीडा प्रकाराचा पुन्हा समावेश करण्याच्या निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे विश्‍वनाथन आनंदसह मातब्बर बुद्धिबळपटूंनी स्वागत केले आहे. बुद्धिबळाबाबत ही अत्यंत सकारात्मक घटना आहे. आता देशासाठी पदकाची मला अपेक्षा आहे, असे पाच...

भारताकडून ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेचे यजमानपद काढले

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तान यांच्यातील टोकाला गेलेल्या राजकीय संघर्षाचा फटका भारतीय कुस्तीला बसला आहे. जुलैमध्ये रंगणाऱ्या ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेचे यजमान भारताकडून काढून घेण्याचा निर्णय जागतिक कुस्ती संघटनने रविवारी घेतला. त्याआधीच या संघटनेने आपल्याशी संलग्न संस्थांना फर्मान सोडले होते की, त्यांनी भारतीय कुस्ती फेडरेशनशी कोणतेच...

स्नुकर स्पर्धा : पीवायसी वॉरियर्स, खार जिमखाना, क्‍यू क्‍लब वॉरियर्स, संघांची आगेकूच

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा पुणे - गटसाखळी फेरीत पीवायसी वॉरियर्स, खार जिमखाना, क्‍यू क्‍लब वॉरियर्स, क्‍यू मास्टर्स अ, कॉर्नर पॉकेट शूटर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे होत असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेचा...

कोहली, बुमराह अव्वलस्थानी कायम

दुबई -आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, महाराष्ट्राच्या केदार जाधवने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले. त्याने 11 स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत 24 वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहली...

सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी उडवला श्रीलंकेचा धुव्वा

काठमांडू - नेपाळमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा 5-0 असा धुव्वा उडवून उपान्त्य फेरीमध्ये प्रवेश केला. "ब' गटातील हा सामना जिंकून भारताने गटात अव्वलस्थान मिळवले आहे. सामन्यात चौथ्या मिनिटालाच भारताने पहिला गोल नोंदवला. विंगर ग्रेस डांगमेई हिने हा गोल केला. सांजूने...

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : गोव्याला हरवून बेंगळुरूला विजेतेपद

मुंबई -बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बेंगळुरूने एफसी गोवा संघावर अतिरिक्‍त वेळेत 1-0 अशी मात केली. अतिरिक्‍त वेळ संपण्यास चार मिनिटे बाकी असताना भारतीय खेळाडू राहुल भेके याने केलेला गोल निर्णायक ठरला. गोव्याला या सत्रात दहा खेळाडूंनीशी...

ठळक बातमी

Top News

Recent News