12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: mns

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात मनसेचे झेंडे 

पिंपरी चिंचवड - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला पक्ष लोकसभा निवडणुका लढवणार...

‘मोदी-शाह’ विरूध्द देश अशी 2019 लोकसभेची निवडणूक – राज ठाकरे

मुंबई - भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न...

‘मनसे’ची तोफ कोणासाठी धडाडणार?

लोकसभा निवडणुकीबाबतच्या भूमिकेवर राजकारणाची दिशा - संतोष गव्हाणे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मनसेचा 13वा वर्धापनदिन दि. 9 मार्चला झाला. त्यादिवशी मनसेकडून लोकसभेबाबतची भूमिका जाहीर होईल, असे वाटत असताना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा लोकसभा निवडणूक लढणार नाही

मुंबई - लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनसेकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे मनसेची लोकसभा निवडणूकीबाबतची मनसेची भूमिका स्पष्ट झाली आहे. मनसे नेते शिरिष सावंत यांनी एक पत्रक जारी करत ही अधिकृत माहिती दिली आहे. मात्र, आता मनसे...

मनसे महाआघाडीत नाहीच; लवकरच राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला राष्ट्रवादीकडून कल्याण, ईशान्य मुंबईतून जागा मिळे ल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित केल्याने महाआघाडीत मनसे सामील होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून आज कल्याण, ईशान्य...

‘महाआघाडी’ची गाडी भरकटली

दिल्ली स्टेशन गाठण्यापूर्वीच "सिटां'वरून राजकीय पक्षांची वेगळी वाट - संतोष गव्हाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना 2019च्या लोकसभा निवडणुकीकरिता एकत्र आल्यानंतर 2014 मध्ये युतीच्या या झंझावात धुळधाण झालेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आघाडी करतानाच राज्यातही अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करण्याची घोषणा...

मनसेचा स्वबळाचा नारा?

पुण्यासह राज्यात 15 जागा लढविणार कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरुद्ध भूमिकांमुळे मनसेबाबत निर्णय होईना पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाला अद्याप "आघाडीच्या डब्यांची जोड' मिळालेली नसली, तरी मनसेने आपले इंजिन स्वबळावरच पळविण्याची तयारीही केली आहे. राज्यातील लोकसभेच्या 14 ते 15 ठिकाणी मनसेने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. लोकसभा निवडणूक...

स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा..? – संदीप देशपांडे

मुबंई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शालेय मुलांच्या कार्यक्रमात डिस्लेक्सिया आजाराबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे .स्मृतीभंश झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा? असा सवाल...

पुणे -‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का?

मनसेचा सवाल : पालकमंत्र्यांकडे कार्यभार देण्याची मागणी पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकाणाच्या (पीएमआरडीए) अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी अॅक्‍ट) जिल्ह्याचे पालकमंत्री हेच पाहिजेत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना हटवून हे पद स्वत:कडे ठेवण्याचे कारण काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला...

पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या आघाडीवर संभ्रमावस्था

आघाडीबाबत अनिश्‍चितता; लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते सैरभैर पिंपरी  - सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविलेली असताना पिंपरी-चिंचवड शहर पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मात्र अद्यापही संभ्रमावस्था आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार की नाही याबाबत अनिश्‍चितता असतानाच पक्ष लोकसभा लढविणार की नाही याबाबत कोणताच निर्णय नसल्याने कार्यकर्ते...

राजकीय ‘व्हॅलेंटाईन’ (अग्रलेख)

जगभरातील प्रेमिक आज आपला आवडता प्रेमाचा उत्सव साजरा करणार असतानाच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे "व्हॅलेंटाईन'ही रंगात आले आहे. "व्हॅलेंटाईन डे'चे निमित्त साधून प्रेमिक जशी प्रेमासाठी चाचपणी करीत असतात, तसेच विविध राजकीय पक्ष युती आणि आघाडीसाठी चाचपणी करीत आहेत. पूर्वीचे प्रेमिक असलेले पण आता काडीमोड...

दुष्काळी उपाय योजना त्वरित सुरू करा : मनसे

जामखेड मनसेची तहसीलदारांकडे मागणी जामखेड - राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्‍यांना विविध योजना जाहीर केलेल्या असताना त्याची प्रभावीपणे अमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन तालुक्‍यातील दुष्काळी उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका दुष्काळग्रस्त असून...

मनसेला आघाडीत घेणार नाहीच – अशोक चव्हाण

पुणे - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी करताना या आघाडीत बहुजन वंचित आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला घ्यायची आमची तयारी आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्ताव दिला तरी कोणत्याही परिस्थितीत मनसेला या आघाडीत घेण्यास आमची मान्यता असणार नाही, असा स्पष्ट इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...

राजकीय धुरळा ! कोण गाजवणार पुणे लोकसभेचे रणांगण ?

पुणे: एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक येताच घोडेबाजार, उमेदवारांची पळवापळवी, फोडाफोडी, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उठायला सुरुवात होते. तसे वातावरण सर्वसामान्यांना मागील पाच राज्यांच्या निवडणुकीपासून पहायला मिळत आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर मात्र कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी...

पुणे – पालिकेतील हिरकणी कक्षाला टाळे

कक्षाच्या गैरवापराच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन पुणे - महापालिकेतील महिला कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांसाठी पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. मात्र, या कक्षाचा वापर इतर कामांसाठी होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कक्षाला मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. तसेच हा कक्ष तातडीने...

पुणे – परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना 300 रुपये परत करण्याचे निर्देश पुणे - कौशल्य विकास व उद्योजक विभागामार्फत मान्यता दिलेल्या इयत्ता दहावीच्या व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी वाढवण्यात आलेल्या शुल्कात घट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, 400 रुपये शुल्क भरलेल्या...

बेस्ट संप : मनसेने कोस्टल रोडचे काम पाडले बंद 

मुंबई - बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. परंतु, प्रशासनाला संपावर अद्याप  काढण्यात यश आलेले नाही. संपावर तोडगा निघाला नाहीतर सोमवारी मुंबईत तमाशा करू, असा इशारा मनसेने रविवारीच दिला होता. यानुसार मनसे आज रस्त्यावर उतरली असून कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडच्या कामाला...

बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे मांडल्या व्यथा 

मुंबई - बेस्टचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेत या संपाला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या व्यथा...

उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे विश्लेषण करणाऱ्यांना १५१ रुपयांचे बक्षीस – मनसे

मुंबई : राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या अयोध्या दौऱ्यानंतर काल पंढरपूरला झालेल्या विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका करत मी झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करायला आलो आहे. त्याचबरोबर राफेल, कर्जमाफी,पीकविमा यामध्ये...

युवकांना संधी, विकासाची हमी ; मनसेचे सुमित वर्मा यांचा वेगवान प्रचार

श्रीराम येंडे : मनसेचे सुमित वर्मा यांचा वेगवान प्रचार नगर: नगर हे पुणे-औरंगाबाद पेक्षा मागे पडले आहे. त्यास हे सत्ताधारी जबाबदारी आहे. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज हे मूलभूत प्रश्‍नही आज सुटलेले नाही, आताच्या निवडणुकीत नगरकरांनी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. सुमित वर्मा यांनी विद्यार्थी सेनेच्या...

ठळक बातमी

Top News

Recent News