12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: Entertainment

‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक

‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख असेल ’२० मार्च’ सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ‘रजिस्ट्रेशन्स’. हॉट सीटवर बसूनप्रश्नांची अचूक उत्तरं देऊन आयुष्य बदलवून टाकण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असलेली रजिस्ट्रेशन्स प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु झाली आहे. ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यासाठी मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली जाणार आहे. आता रजिस्ट्रेशन्ससाठी शिल्लक आहेत फक्त दोन दिवस, त्यामुळेज्यांनी अजूनही मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली नसेल तर त्यांनी अचूक उत्तरासाठी 9164291642 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह (Sony Liv) ऍपवर रजिस्टर करा. प्रेक्षकांनी ११ मार्चपासून सुरु झालेल्या रजिस्ट्रेशन्स प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि कमी वेळेत आलेल्या भरपूर एंट्रीजमधून हे दिसून येते की प्रेक्षक या खेळाप्रती फारच उत्सुक आहेत. पणआता फक्त काही तास शिल्लक आहेत म्हणजेच स्पर्धक म्हणून या खेळात सहभागी होण्यासाठी २० मार्च ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करायला विसरु नका आणिसहभागी व्हा ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कारण उत्तर शोधलं की जगणं बदलतं.

कतरिनाने घेतली 65 लाखांची कार

कतरिनाने दुबईवरून परत आल्यावर आपल्या कारच्या ताफ्यामध्ये एक आलिशान रेंज रोव्हर घेतली आहे. तब्बल 50 ते 55 लाखांच्या या कारला नंबर मिळावा यासाही तिने त्या कारचे रजिस्ट्रेशनही केले आहे. ही कार सलमानकडून कतरिनाला गिफ्ट मिळाली आहे, असेही बोलले जाते आहे. सलमानने गेल्या काही दिवसात...

अजय देवगण आणखी एका युद्धपटाचा नायक

बायोपिकच्या जमान्यामध्ये अजय देवगण भारत-पाक युद्धातील हवाई दलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव 'भूज द प्राइड ऑफ इंडिया' असे असून या चित्रपटाला 1971 साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी असणार आहे. भारत पाकिस्तान युद्धावर यापूर्वी अनेक चित्रपट आले...

धर्मेंद्र यांनी केली शेती करायला सुरुवात

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे एकेकाळी सुपरस्टार म्हणून नावाजले होते. त्यांच्या अभिनयाची क्रेझ आजही चाहत्यांत पाहायला मिळते. मात्र, अलिकडे त्यांनी अभिनयातून विश्रांती घेतली आहे. लाईमलाईटपासून दूर होत त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आता ते त्यांचा संपूर्ण वेळ फार्म हाऊसवर घालवतात. त्यांचा एक...

आलिया भटकडून ड्रायव्हर आणि हेल्परला घराची भेट

बॉलिवूडचे कलाकार किती मोठ्या हृद्‌याचे असू शकतात, हे आपण स्क्रीनवर बघतो. पण प्रत्यक्ष्यातही काही कलाकार मोठ्या मनाचे असतात, अशी उदाहरणे आपल्याला सापडू शकतील. मुंबईसारख्या महानगरामध्ये स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करणे म्हणजे किती अशक्‍यप्राय गोष्ट आहे, हे सर्वांनाच माहित आहे. आलिया भटने आपला ड्रायव्हर आणि...

ट्रोल करणा-यांना करिना कपूरचे सडेतोड उत्तर

बॉलीवूडची बेबो अर्थात करिना कपूरही मुलगा तैमूर व पती सैफ अली खानसोबत मालदिवला सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. या ठिकाणचे काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र, तिने बिकनी घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्याने तिच्यासह सैफलाही ट्रोल करण्यात आले. त्याला करिना कपूरने सडेतोड...

“आरआरआर’मध्ये झळकणार अजय देवगण

बॉलीवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या "बाहुबली' या चित्रपटांला घवघवीय यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी "आरआरआर' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटातील स्टारकास्टबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. यासाठी राजामौली यांनी हैद्राबाद येथे एका पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली. यावेळी टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि...

सायनाच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूरची एक्‍झिट

भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची व्यक्तीरेखा साकारणार होती. या बायोपिकच्या तयारीसाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. एवढेच नव्हे तर सायनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र...

आमिर खानचे चाहत्यांना स्पेशल बर्थडे “गिफ्ट’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान नुकताच आपला वाढदिवस साजरी केला. आपल्या जन्मदिनी नेहमीप्रमाणे आमिरने माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी आमिरची पत्नी किरण रावही हजर होती. आमिरने केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना स्पेशल बर्थडे "गिफ्ट' दिले. "लाल सिंह चड्‌ढा'...

सनी लिओनच्या बायोपिकच्या सीझन 3 शुटिंग पूर्ण

सनी लिओनच्या आयुष्यावर आधारीत वेबसिरीज "करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी'च्या सीझन 3 चे शुटिंग पूर्ण झाले आहे. सनीने इन्स्टाग्रामवर याचा ट्रेलर शेअर केला आहे. सीझन 3 चा प्रिमिअर 5 एप्रिलला होणार आहे. सीझन 2 मध्ये सनीच्या आयुष्यातील इतर उतार चढाव दाखवले जाणार आहेत....

वरुण आणि नताशाचे लग्न मालदिवमध्ये

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा लवकरच विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू आहे. आपले लग्न खूप धुमधडाक्‍यात व्हावे, अशी नताशाची ईच्छा आहे. त्यामुळे त्यांनी खास वेडिंग डेस्टिनेशन निवडले आहे. त्यासाठी तिने मालदिवला पहिली पसंती दिली आहे. मालदिवच्या बीचच्या परिसरामध्ये...

“केजीएफ’च्या सिक्‍वलचे शूटिंग सुरू

बॉलीवूडमध्ये गतवर्षी प्रदर्शित झालेला साउथचा सुपरस्टार यश याचा "केजीएफ ः चॅप्टर-1' चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटाने यशाची नवनवे शिखर पार करत अनेक विक्रमही प्रस्थापित केले होते. त्यानंतर चित्रपटाच्या सिक्‍वलबाबत चाहत्यांना उत्सुकता होता. आता चित्रपटाच्या पुढील सिक्‍वलचा अर्थात "केजीएफ ः चॅप्टर-2'चे शूटिंग सुरू...

“साहो’साठी प्रभासने घटवले आपले वजन

बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता आपल्या आगामी "साहो' चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. "साहो'च्या निर्मात्यांनी नुकत्याच "शेड्‌स ऑफ साहो'ची मालिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये चित्रपटाच्या निर्मितीची झलक दिसून येते, या दोन्ही अध्यायांमध्ये कास्टची झलक दिसत आहे. या मालिकेत व्हिडिओचे ऍक्‍शन आणि...

मोदींचा प्रवास ‘इरॉन नाऊ’ वेब सिरीजमधून उलगडणार

दहा भागांची सिरीज असून, फैझल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर हे तीन अभिनेते मोदींच्या भुमिकेत दिसणार   पंतप्रधान मोदींच्या जीवनारवर चित्रपटाची घोषणा झाली असतानाच आता, चित्रपटानंतर वेब सिरीजही प्रदर्शनच्या वाटेवर आहे. 'इरॉन नाऊ' दहा भागांची सिरीज सुरु करणार असून, फैझल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर हे...

MovieReview: कनफ़्युज असलेल ’ती अँड ती’ 

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर ‘ती अ‍ॅण्ड ती’ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘ती अ‍ॅण्ड ती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णीने यांनी केले आहे. यापूर्वी ‘रमा माधव’ आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असे वेगळे चित्रपट दिले आहेत, तर सोनाली कुलकर्णी ’हंपी’ नंतर...

आलिया करणार अरुणिमा सिन्हाचा रोल

आलिया भट सध्या भलतीच फॉर्मात आहे. अलिकडेच रिलीज झालेला तिचा "गली बॉय' सॉलिड हिट झाला आहे. याशिवाय "कलंक', "ब्रम्हास्त्र' आणि "सडक 2' मध्येही आलिया दिसणार आहे. याबरोबरच आणखीन एका सिनेमाच्या प्रोजेक्‍टमध्ये आलियाचा लीड रोल असणार आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात पहिली दिव्यांग भारतीय...

फॅनकडून प्रभासला मिळाली थप्पड

"बाहुबली' फेम प्रभासचा "साहो' या वर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. ऍक्‍शनचा भडिमार असलेल्या या सिनेमाची प्रभासचे फॅन अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. याच दरम्यान सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल व्हायला लागला आहे. "साहो'च्या उरलेल्या शुटिंगसाठी प्रभास लॉस एंजेलिसला जात असताना त्याच्या जवळ एक...

पुलवामा हल्ल्यामुळे “हमिद’चा रिलीज पुढे ढकलला

"सीआरपीएफ'चा जवान आणि 8 वर्षांचा एक मुलगा यांच्यातील सौहार्दाच्या संबंधांवर आधारीत "हमिद' हा सिनेमा आता 15 मार्चला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 1 मार्चला रिलीज होणार होता. पण गेल्या महिन्यात पुलवामामध्ये "सीआरपीएफ'च्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे निर्मात्यांनी सिनेमाचा रिलीज पुढे ढकलण्याचा ऐनवेळी निर्णय...

भन्साळींच्या सिनेमात अभिषेक ऐश्‍वर्या एकत्र

"पद्‌मावत'नंतर संजय लिला भन्साळी आणखी एका सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. प्रसिद्ध कवि आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. या सिनेमातील लीड रोलबाबत सध्या खूपच चर्चा होते आहे. "गुलाब जामुन'नंतर अभिषेक आणि ऐश्‍वर्या याच सिनेमात एकत्र दिसणार आहेत. भन्साळींनी या...

‘पिंक’ सिनेमा आता तमिळमध्ये ; पहिला लूक रिलीज 

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा बहुचर्चित 'पिंक' सिनेमाचा तमिळ रिमेक येत आहे. 'नेरकोंडा पारवाई' (Ner Konda Paarvai) असं या सिनेमाचं नाव आहे. 'नेरकोंडा पारवाई' सिनेमाचं फस्ट पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एच.विनोद यांनी केलं असून, सिनेमात 'विद्या बालन' सुद्धा दिसून...

ठळक बातमी

Top News

Recent News