12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: cricket

IPL2019 : आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई -भारतीय क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या 2 आठवड्यांचे वेळापत्रक या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या मोसमाचे उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार...

#व्हिडीओ : राजू शेट्टी क्रिकेटच्या मैदानात; जोरदार फटकेबाजी

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे चक्क लोकसभेच्या रिंगणाततून थेट क्रिकेटच्या रिंगणात उतरल्याचे आज पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे या गावात प्रचारा दरम्यान राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळत षटकार लगावला. राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघातून पुन्हा लोकसभेच्या...

क्रिकेट : पाकिस्तानकडून 11 कोटींची भरपाई

नवी दिल्ली - क्रिकेट मालिका आयोजित न करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) कायदेशीर लढाई लढणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दणका दिला होता. त्याची नुकसानभरपाई म्हणून 11 कोटी रुपये पीसीबीने बीसीसीआयकडे सुपूर्द केले आहेत, असा दावा पीसीबीने केला आहे. पीसीबीने आयसीसीच्या क्रीडा...

विश्‍वचषकाच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही – रिचर्डसन

लंडन- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या वतीने 30 मे ते 14 जुलै या कालावधीत विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र, न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्व जगाला धक्‍का बसला असून विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी...

चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायडू योग्य – हेडन

नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्‍वचषक अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने अंबाती रायडू हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत मांडले...

कोहली, बुमराह अव्वलस्थानी कायम

दुबई -आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, महाराष्ट्राच्या केदार जाधवने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले. त्याने 11 स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत 24 वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहली...

अफगाणिस्तानचा पहिला कसोटी विजय

विजयात रशिद खान, रहमत शाहची चमकदार कामगिरी देहराडून -अफगाणिस्तान संघाने सोमवारी कसोटी सामन्यात आयर्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवून इतिहास घडवला असून त्यांचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. विशेष म्हणजे आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिला विजय मिळवणारा अफगाणिस्तान हा इंग्लंड आणि पाकिस्ताननंतरचा दुसरा संघ...

महेंद्रसिंग धोनीला कमी लेखू नका – क्‍लार्क

मुंबई - ऑस्ट्रेलिया संघाने 0-2 अशा पिछाडीवरून दमदार कमबॅक करताना पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाने 2009नंतर प्रथमच भारतात एकदिवसीय मालिका जिंकली. या मालिकेतून भारतीय संघाला मधल्या फळीत भक्कम पर्यायाची गरज असल्याचे पुन्हा एकदा जाणवले. याबाबत उत्तर देताना क्‍लार्कने धोनीचे महत्त्व सांगितले. आगामी विश्‍वचषक स्पर्धेत...

विदर्भाने पटकाविले विजेतेपद; अंतिम सामन्यात दिल्लीवर 4 विकेट्‌सने मात

23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा हैदराबाद - 23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भ संघाने दिल्लीवर चार गड्यांनी मात करत पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले. पवन परनाते याने केलेल्या नाबाद 88 धावांच्या जोरावर विदर्भाने यंदाच्या वर्षातील चौथे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले. स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाणेफेक...

हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेसची विजयी सलामी

एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धा पुणे  - ई2डी स्पोर्टस तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत हनीवेल, त्रिशा एंटरप्रायझेस या संघांनी अनुक्रमे इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक व बीएमएफ या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत...

चौथ्या क्रमांकासाठी धोनीच योग्य – अनिल कुंबळे

नवी दिल्ली  - भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर साजेशी कामगिरी करेल अशा आदर्श फलंदाजाच्या शोधात आहे. त्यासाठी भारताने अनेक पर्यायांचा अवलंब देखील केला आहे. मात्र अजुनही या क्रमांकासाठी आदर्श खेळाडू भारतीय संघाला सापडलेला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस योग्य असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी हाच आहे,...

श्रीसंथ वरिल अजिवन बंदी उठवली

सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला पुर्नविचार करण्याचे आवाहन नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणी आजीवन बंदीच्या शिक्षेचा सामना करावा लागणाऱ्या श्रीसंथला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बीसीसीआयकडून श्रीसंथवर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली असून श्रीसंथला यापुढेही क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने...

व्हेकेशन्स कॉर्पोरेट लीगमधे 16 संघ सहभागी होणार

पुणे - सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  आहे. हि स्पर्धा व्हेरॉक क्रिकेट मैदान आणि लिजेंड्‌स क्रिकेट मैदान येथे 16 मार्च पासून सुरु होणार आहे. स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून यामध्ये वेंकीज(गतविजेता), एसपीजे...

शिवनेरी लायन्स्‌ संघ उपांत्यपुर्व फेरीत

एस.बालन करंडक आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा पुणे  - पीबीइएल शिवनेरी लायन्स्‌ संघाने पिल्सनर्स सीसी संघाचा पराभव करत येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि पुनित बालन एन्टरटेन्मेंट आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "एस. बालन करंडक आंतर...

रिचर्डस यांना मागे टाकून कोहली सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू होण्याच्या वाटेवर -शेन वॉर्न

नवी दिल्ली - विराट कोहली सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र, सर डॉन ब्रॅडमन हे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. त्यामुळे त्यांच्यानंतर कोणता खेळाडू सर्वोत्तम आहे यावर चर्चा करणे कठीण आहे. माझ्या मते सर व्हिवीअन रिचर्डस हे मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम होते, सध्या विराट कोहली रिचर्डस...

विश्‍वचषकासाठीचा संघ तयार – विराट कोहली

एका स्थानासाठी पर्याय शोधने आवश्‍यक नवी दिल्ली - विश्‍वचषका पुर्वीची अखेरची मालिका भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-2 अशा फरकाने गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील खराब कामगिरीचे खापर कोणत्याही एका खेळाडू अथवा खेळपट्टीवर न फोडता या मालिकेत विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पात्र होता असे विधान केले...

अजिंक्‍य रहाणेवर निवड समितीकडून अन्याय – दिलीप वेंगसरकर

मुंबई- विश्‍वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम 15 जणांचा संघ निवडत असून य संघातील खेळाडू अजुन निश्‍चीत करण्यात आलेले नाहीत. मात्र, संघातील तिसरा सलामीवीर आणि चौथ्या क्रमांकावरील फलंदाज निवडण्याच्या दृष्टीने संघ व्यवस्थापना समोर अडचणी असून या क्रमांकावर खेळू शकेल अशा अजिंक्‍य रहाणेचा समितीने विचारच...

अजिंक्‍य रहाणेला परत आणा – नेटिझन्सची मागणी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-2 अशी गमावली. मालिकेच्या सुरुवातीला भारत 2-0 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर मात्र सलग तीन सामने भारताने गमावले आणि मालिका ऑस्ट्रेलियाने खेचून नेली. या मालिकेत भारताच्या फलंदाजीवर बरेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशा केली. प्रामुख्याने मधल्या फळीतील...

प्रिमिअर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत 20 संघांचा सहभाग

पुणे - ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 16 मार्चपासून दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये एचडीएफसी, एसएसजी,...

#INDvAUS : कोटला मैदानावर भारताचे पारडे जड

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाच्या संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे होणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जवळपास दहा वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फिरोजशाह कोटला या मैदानावर...

ठळक बातमी

Top News

Recent News