टेबल टेनिस स्पर्धा : शौनक शिंदे आणि ईशा जोशी यांचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश 

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा 

पुणे: शौनक शिंदे व ईशा जोशी या पुण्याच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना नाशिक येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या यूथ मुले आणि महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र पुण्याच्या सनत बोकीलला पराभवाचा धक्‍का बसला. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेतील यूथ बॉईज एकेरीत सहावे मानांकन असलेल्या शौनक शिंदेने अकरावे मानांकन असलेल्या कौस्तुभ उदारचा 11-5, 11-5, 11-9, 9-11, 11-8 असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर महिला एकेरीत ईशा जोशीने नववे मानांकन असलेल्या अदिती सिन्हाचा 11-7, 6-11, 11-9, 11-5, 9-11, 11-5 असा पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला. 

यावेळी यूथ गर्ल्स एकेरीत दिशा हुलावळे, अदिती सिन्हा, समृद्धी कुलकर्णी, मानसी चिपळूणकर, तिसरे मानांकन असलेली श्रुती अमृते, अनन्या बसाक, विधी शहा आणि दुसरे मानांकन असलेली सृष्टी हलेंगडी यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर यूथ बॉईज प्रकारात अग्रमानांकित सिद्धेश पांडे, तेजस कांबळे, दीतित पाटील, अश्‍विन सुब्रह्मण्यम, तिसरे मानांकन असलेला रेगन अल्बुकर्क, शौनक शिंदे, विपुल नांदकर, दुसरे मानांकन असलेला शुभम आंब्रे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महिला एकेरीत चौथे मानांकन असलेली सृष्टी हलेंगडी, अग्रमानांकित दिव्या महाजन, ईशा जोशी, स्नेहल पाटील, तिसरे मानांकन असलेली ममता प्रभू, श्रुती अमृते, मानसी चिपळूणकर, दुसरे मानांकन असलेली सेन्होरा डिसुझा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत अग्रमानांकित सिद्धेश पांडे, दीपित पाटील, जश दळवी, तन्मय राणे, मंदार हार्डीकर, रेगन अल्बुकर्क सानिश आंबेकर व रवींद्र कोटियन यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)