टेबल टेनिस स्पर्धा: पूजा, मनुश्री, सिद्धेश यांची विजयी सलामी

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

पुणे:पुण्याची पूजा जोरावर व मुंबई उपनगरची मनुश्री पाटील यांनी यूथ मुलींच्या एकेरीत, तर सिद्धेश पांडे, तेजस कांबळे व दीपित पाटील या ठाण्याच्या खेळाडूंनी यूथ मुलांच्या एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेबल टेनिस हा खेळ जगाच्या नकाशावर प्रथम क्रमांकावर आला आहे. खेळाडूंनी कठोर मेहनत केल्यास आपले आणि आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याची त्यांना निश्‍चितच संधी आहे, असे मत ऑलिम्पिकपटू व अर्जुन विजेते कमलेश मेहता यांनी व्यक्‍त केले. नाशिक जिमखाना येथे आयोजित या स्पर्धेचे उदघाटन करताना ते बोलत होते.

राज्य संघटना जेवढी काळजी खेळाडू घडवताना घेतात तेवढीच काळजी त्यांच्या पुढील आयुष्याची आणि कारकिर्दीची घेतली, तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्टीय खेळाडू निश्‍चितच तयार होतील असे मत उद्‌घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे व म्हणून भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्‍ते प्रा. सुहास फरांदे यांनी व्यक्‍त केले. या वेळी यतीन टिपणीस, नरेंद्र छाजेड, प्रकाश जसानी, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, संजय मोडक, प्रमुख पंच रोहित शिंदे, आनंद खरे, नितीन चौधरी, एचडीएफसी बॅंकेचे चैतन्य डबीर, एकवीराचे वैभव जोशी, संजय मोडक, करण रौंदळ, संजय कोटेचा, पियुष चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.

आजचे निकाल –

यूथ मुले एकेरी- सिद्धेश पांडे (ठाणे) वि.वि. जश दळवी (ठाणे) 11-4, 11-7 व 11-4, तेजस कांबळे (ठाणे) वि.वि. प्रथमेश पारकर (ठाणे) 11-7, 11-8 व 11-8, दीपित पाटील (ठाणे) वि. वि. तन्मय राणे (मुंबई शहर ) 8-11, 11-4, 11-4, 9-11 व 11-4, अश्विन सुब्रमण्यन (मुंबई उपनगर) वि. वि. आर्य सेठी (पुणे) 11-8, 11-6 व 11-6, युगांध झेंडे (ठाणे) वि. वि. विराज कोटेचा (नाशिक ) 10-12, 11-6, 8-11, 11-6 व 11-5, मंदार हळदीकर (मुंबई उपनगर) वि. वि. करण कुकरेजा (पुणे) 11-8, 11-8 व 11-5, यूथ मुली एकेरी- पूजा जोरवार (पुणे) वि.वि. अनुजा झंवर (नाशिक) 13-11, 11-7, 09-11 व 11-8, मनुश्री पाटील (मुंबई उपनगर) वि.वि. साक्षी अफजलपूरकर (नाशिक ) 13-11, 11-7, 11-3.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)