सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल, गुरुकुल हिंदी मीडियम स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल यांची आगेकूच 

ग्रीनबॉक्‍स आंतरशालेय 12 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा 
पुणे: सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल, गुरुकुल हिंदी मीडियम स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून ग्रीनबॉक्‍स आंतरशालेय 12 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. ग्रीनबॉक्‍स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत पहिल्या सामन्यात सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल संघाने डॉन बॉस्को हायस्कूल संघाचा टायब्रेकमध्ये 5-4 असा पराभव करून उप-उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये विजयी संघाकडून ईशान सिंग, जैंवेल सांघवी, युवराज मिलानी, आरुष कपूर यांनी गोल केले. तर, पराभूत संघाकडून श्रवण परिहार, सुजल गायकवाड यांना गोल मारण्यात अपयश आले.
आणखी एका चुरशीच्या झालेल्या लढतीत गुरुकुल हिंदी मिडीयम स्कूल संघाने द ऑर्चिड स्कूल संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून आगेकूच केली. निर्धारित वेळेअखेर 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये गुरुकुलने बाजी मारली. गुरुकुलकडून अनमोल पांडेने निर्धारित वेळेत, तर, अनमोल पांडे व श्रेय किशोर यांनी टायब्रेकरमध्ये गोल केले. ऑर्चिड स्कूलकडून प्रांजल कुलकर्णीने निर्धारित वेळेत, तर वंकिश कुमारने टायब्रेकरमध्ये गोल केला. अन्य लढतीत इंदिरा नॅशनल स्कूल संघाने मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा 5-1असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. इंदिरा स्कूलकडून निहार कुचंकरने (16, 18मि.)दोन गोल, तर अनिरुद्ध क्षेत्री, सिद्धार्थ खंडेलवाल, सिद्धांत जैन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सविस्तर निकाल- 
दुसरी फेरी – सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल- 5 (ईशांत उप्पल 21वे मि., ईशान सिंग, जैंवेल सांघवी, युवराज मिलानी, आरुष कपूर, गोल चुकविले- शेरियार मझदा) टायब्रेकरमध्ये वि.वि. डॉन बॉस्को हायस्कूल- 4 (रोहित नायर 4थे मि., रोहित नायर, स्मित भालेराव, ऍलन पाटोळे, गोल चुकविले- श्रवण परिहार व सुजल गायकवाड); पूर्ण वेळ: 1-1;
गुरुकुल हिंदी मीडियम स्कूल- 3 (अनमोल पांडे 8वे मि., अनमोल पांडे, श्रेय किशोर, गोल चुकविले- आदित्य भट) टायब्रेकरमध्ये वि.वि. द ऑर्चिड स्कूल- 2 (प्रांजल कुलकर्णी 4थे मि., वंकिश कुमार, गोल चुकविले: आरव कोटकर, सोहम जाधव); पूर्ण वेळ: 1-1;
इंदिरा नॅशनल स्कूल- 5 (अनिरुद्ध क्षेत्री 8वे मि., निहार कुचंकर 16 व 18वे मि., सिद्धार्थ खंडेलवाल 17वे मि., सिद्धांत जैन 21वे मि.) वि.वि. मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल- 1 (ओंकार चव्हाण 7वे मि.).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)