#SyedMushtaqAliTrophy : दिल्लीचा मणिपूरवर 10 विकेटने विजय

विजयवाडा – उन्मुक्त चंदच्या नाबाद 53 आणि हितेन दलालच्या नाबाद 56 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने शुक्रवारी देवीनेनी वेंकट रमन प्रानीथ मैदानावर झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी20 टूर्नामेंटमध्ये ग्रुप ए मधील सामन्यात मणिपूरवर 10 विकेटने विजय संपादित केला आहे.

दरम्यान, मणिपूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 113 धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने बिनबाद 11.4 षटकांत 114 धावा करत विजय मिळविला. हितेन दलालने आपल्या खेळीत 38 चेंडू खेळताना 10 चौकार आणि 1 षटकाराचा मारा केला. तर मणिपूर संघाकडून यशपाल सिहंने 44 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/BCCIdomestic/status/1098824578594332672

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)