स्वीस बॅंकेतील भारतीयांची रक्‍कम घटली

झुरिच/ नवी दिल्ली- स्वीस बॅंकेत भारतीयांनी आणि उद्योगांनी ठेवलेल्या रकमेत 2018 मध्ये 6 टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. स्वीस नॅशनल बॅंकेकडून आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्वीस बॅंकेत भारतीयांचे 955 दशलक्ष स्वीस फ्रॅंक (सुमारे 6,757 कोटी रुपये) इतकी रक्कम आहे. ही रक्कम गेल्या दोन दशकात दुसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी पातळीवर गेली आहे.

स्वीस बॅंकेच्य सर्व विदेशी खातेदारांच्या एकत्रित रक्कम 2018 मध्ये 4 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 1.4 ट्रिलियन (सुमारे 99 लाख कोटी रुपये) इतकी झाली असल्याचे बॅंकेच्या वार्षिक अहवालामध्ये म्हटले आहे. स्वीत्झर्लंडमधील झुरिच येथील बॅंकिंगच्या मध्यवर्ती संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

“बॅंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट’च्या आकडेवारीमध्ये भारतीयांकडून स्वीस बॅंकांमध्ये ठेवलेल्या रकमेत 2018 मध्ये 11 टक्के इतकी मोठी घट झाल्याचे आढळून आले होते. स्वीस नॅशनल बॅंकेच्या डाटामध्ये भारतीय खातेदारांच्या सर्व ठेवींचा विचार करण्यात आला आहे. त्यात व्यक्ती, बॅंका आणि उद्योगांच्या ठेवींचाही समावेश आहे. यामध्ये स्वीस बॅंकांच्या भारतातील खात्यांच्या डाटाचाही समावेश करण्यात आला आहे. या ठेवी म्हणजे स्वीस बॅंकेसाठी भारतीयांचा काळा पैसा असे समजले जाऊ शकत नाही. तसेच भारतीय, अनिवासी भारतीय किंवा उद्योगांनी अन्य देशांमधील खातेदारांच्या नावे स्वीस बॅंकेत ठेवलेल्या रकमेचाही यामध्ये समावेश नाही.

स्वीस बॅंकेतील भारतीयांची रक्‍कम 2017 मध्ये 50 टक्‍क्‍यांनी वाढून 1.01 ट्रिलियन (7 हजार कोटी रुपये) इतकी झाली होती. त्यापूर्वी तीन वर्षे ही रक्‍कम सातत्याने कमी होत गेली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)