स्वाईन फ्लू सदृश आजाराने एकाचा मृत्यू

File Photo

चांदे – नेवासे तालुक्‍यातील म्हाळस पिंपळगाव येथील एका व्यक्तीचा स्वाईन प्लू सदृश आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे दवाखान्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. या व्यक्तीस काही दिवसांपुर्वी सर्दी ताप येवू लागल्याने नेवासे फाटा येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर स्वाईन फ्लू सदृश आजाराचे उपचार केले. त्यांचा आजार आटोक्‍यात येत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्याचा सल्ला दिला.

पुणे येथे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. तसेच त्यांच्या मुलाला स्वाईन फ्लू सदृश आजाराची लक्षणे दिसू लागताच, त्याला उपचारासाठी नगर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

-Ads-

म्हाळस पिंपळगाव परिसरात स्वाईन प्लूच्या भितीने लोक एकत्र येत नाहीत. तसेच अनेकांनी आपल्या तोंडाला रुमाल बांधलेले दिसत होते. ग्रामपंचायतीने काही दिवसांपुर्वी औषध व धूर फवारणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)