स्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग २)

स्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग १)

पावसाळी वातावरणामध्ये काही ना काही तक्रारी सुरूच असतात. थोडासा सर्दी खोकला, घसा खवखवणे अशा तक्रारी तर पावसाळ्यात नेहमीच पाहावयास मिळतात; मात्र यंदाच्या पावसाळ्यात अशा तक्रारी थोड्या प्रमाणात जरी जाणवल्या तरी मनात एकच धास्ती निर्माण होते आणि ही धास्ती असते स्वाइन फ्लूबद्दलची.

प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी संत्री-मोसंबी, आवळा, लिंबू यासारखी सी व्हिटामिनयुक्‍त फळे, पालेभाज्या, च्यवनप्राश यांचा आहारात जरूर समावेश करावा. याच जोडीला पौष्टिक चौरस, हलका आहार ठेवावा. थोडक्‍यात पूर्ण संतुलित आहार घ्यावा, ज्यामुळे शरीरास आवश्‍यक रोगप्रतिकारशक्‍ती नक्‍कीच वाढण्यास मदत होते. मुबलक प्रमाणात पाणी पिणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारीसाठी घरगुती उपाय म्हणजे हळदीच्या पाण्याने गुळण्या करणे, यासाठी एक कप पाण्यात दोन ते तीन चिमूट हळद घालून, अर्धा ते पाऊण कप होईतो आटवावे. हे अर्काचे पाणी तोंडात 1 मिनिटभर सर्वत्र फिरवावे. असे दिवसातून किमान 2 ते 3 वेळा तरी करावे; मात्र त्यानंतर लगेचच साध्या पाण्याने चूळ भरू नये. अथवा काही खाऊ-पिऊ नये. यासमवेत तुळस, वावडिंग, बेल, शेपवा, लसूण यांचा काढा बनवून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. स्वाइन फ्लूचे कुठलेही लक्षण दिसत नसले तरीसुद्धा हे सर्व उपाय अवश्‍य करावेत. यामुळे अशा रोगास प्रतिबंध करता येऊ शकतो.

या आजारावर होमिओपॅथिक औषधे अतिशय उपयुक्‍त ठरू शकतात. होमिओपॅथिक औषधे व्यक्‍तिसापेक्ष असतात. रुग्णाचा पूर्वेतिहास जाणून घेऊन, त्याची मानसिकता देखील अभ्यासून औषधे दिली जातात. स्वाइन फ्लूचे औषध देतानाच व्यक्‍तिसापेक्ष इतर काही लक्षणे असल्यास त्यावरदेखील उपाय करता येतो. इंफ्ल्यूएंझिनम्‌ (Influenzinum) हे औषध सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारचा व्हायरल फ्लू असल्यास दिले जाते, ज्यामध्ये थंडी वाजून ताप येण्याबरोबरच सर्दी, खोकलाही असतो. बेलाडोना (Belladona) हे औषध अचानक वाढणारा ताप, तापातील डोकेदुखी अशा तक्रारीवर दिले जाते.

खूप अंगदुखी असता ताप असल्यास (ज्याला बोली भाषेत हाड्याताप असेही संबोधले जाते.) युपॅटोरीयम परफोलिअटम्‌ (Eupatorium Perfoilatum) हे औषध दिले जाते. हिपारसल्फ (Hepar sulph) या औषधाचा उपयोग घसा खवखवणे, लाल होणे, दुखणे या प्रकारच्या घशाशी संबंधित तक्रारीवर होतो. वारंवार होणारी सर्दी खोकला, थंड पदार्थ सेवन केल्यास अथवा थंड हवेशी संपर्क आल्यास होणाऱ्या तक्रारींवर मात करण्यासाठी बरायटा कार्ब (Baryta Carb) हे औषध उपयुक्‍त ठरते. या रोगाची, अथवा कोणत्याही आजाराची मानसिक भीती बाळगणाऱ्यांसाठी ऍकोनाईट (Aconite), अर्सेनिकम्‌ अल्बम (Arsenicum Album) ही औषधे वापरतात; मात्र ही औषधे रुग्णामध्ये आढळणाऱ्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार व आवश्‍यकतेनुसा, किती मात्रेत घ्यावीत, दिवसातून किती वेळा किती वेळाने घ्यावीत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच ठरविले जाते.

म्हणूनच याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणतीही औषधे मनानेच घेऊ नयेत. सारांश असा की, कोणतेही औषध हे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत. म्हणूनच स्वाइन फ्लूचे जास्त भय न बाळगता, योग्य ती खबरदारी घेऊन आपण स्वाइन फ्लूसदृश लक्षणांवर सहज मात करू शकतो.

म्हणजेच.
1) स्वाइन फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास, त्वरित तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा.
2) घराबाहेर पडताना मास्क अथवा 3 पदरी, स्वच्छ हात रुमालाने नाक-तोंड झाकावे.
3) सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्‍यतो टाळावे.
4) इतरांच्या कोणत्याही वस्तू वापरू नयेत.
5) दिवसातून किमान 5 ते 6 वेळा हात – पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
6) दिवसातून किमान 2 ते 3 वेळा हळदीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
7) संतुलित आहार घेऊन भरपूर पाणी प्यावे.

स्वाइन फ्लू टाळण्यासाठीच्या आवश्‍यक गोष्टी समजून घेऊन आपण सर्वांनीच जागृत रहावे, इतरांनाही जागृत करावे. अर्थात यावर्षी आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पांचे आगमन अगदी साधेपणाने करूया आणि या स्वाइन फ्लू नावाच्या राक्षसाला पिटाळून लावूया.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)