स्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग १)

पावसाळी वातावरणामध्ये काही ना काही तक्रारी सुरूच असतात. थोडासा सर्दी खोकला, घसा खवखवणे अशा तक्रारी तर पावसाळ्यात नेहमीच पाहावयास मिळतात; मात्र यंदाच्या पावसाळ्यात अशा तक्रारी थोड्या प्रमाणात जरी जाणवल्या तरी मनात एकच धास्ती निर्माण होते आणि ही धास्ती असते स्वाइन फ्लूबद्दलची.

सर्दी खोकला, घसा खवखवणे ही स्वाइन फ्लूची प्राथमिक स्वरूपाची लक्षणे आहेतच; मात्र घसादुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब, अशक्‍तपणा हीदेखील लक्षणे आढळतात, परंतु थोडासा घसा खवखवणे, शिंका येणे म्हणजे स्वाइन फ्लू असा याचा अर्थ नव्हे. अशी लक्षणे तर आपण नुसते पावसात भिजतो, पंख्याखाली बराच वेळ बसलो, काही तेलकट-तुपकट पदार्थ, बटर चीज, जास्त आंबवलेले पदार्थ खाण्यात आले तरीसुद्धा दिसू शकतात; मात्र ही लक्षणे योग्य त्या औषधोपचारानेसुद्धा 3 दिवसांमध्ये कमी होत नसल्यास, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने स्वाइन फ्लूच्या एच वन एन वन (H1 N1) या विषाणूची तपासणी करून घ्यावी. तसेच धाप लागणे, ओठ व बोटे काळी निळी पडणे, शुद्ध हरपणे, अन्नपाणी कमी प्रमाणात घेतले जाणे यासारखी गंभीर लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरित इस्पितळात दाखल करावे.

येथे नमूद करावेसे वाटते की, डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी तपासणी केंद्रात गर्दी करणे योग्य नव्हे, कारण स्वाइन फ्लूने बाधित असणाऱ्या व्यक्‍तीच्या संपर्कात जर एखादी निरोगी व्यक्‍ती आली तर अशा व्यक्‍तीला स्वाइन फ्लू होण्याची शक्‍यता असते.

-Ads-

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाइन फ्लूची लक्षणे अशा व्यक्‍तीमध्ये लवकर जाणवतात; ज्यांची मूलत:च प्रतिकारशक्‍तीच कमी असते, अथवा इतर काही आजारामुळे कमी झालेली असते, यामध्ये श्वसनाचे इतर आजार, मधुमेह, हृदयाचे विकार, पोटाचे विकार इत्यादी अशा आजारांमुळे बाहेरील वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता कमी झालेली असते. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्‍यता अधिक असते, याचे कारण म्हणजे लहान मुलांची प्रतिकार करण्याची क्षमताच असून तितकीशी निर्माणच झालेली नसते.

याचबरोबर अस्वच्छता हेदेखील एक महत्त्वाचे कारण. लहान मुले एकमेकांसोबत खेळतात, मातीत खेळतात आणि नंतर एकमेकांच्या संपर्कात असताना जर एखाद्या व्यक्‍तीस सर्दी-खोकला असेल आणि त्यावेळी खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर केला जात नसेल, तर या रोगाचा प्रसार लवकर सुरू होऊ शकतो. खेळताना अशी व्यक्‍ती निरोगी व्यक्‍तीच्या संपर्कात आल्यास स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे, परंतु मुले खेळून आल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुण्यास टाळाटाळ करतात. खरे तर ही गोष्ट केवळ लहान मुलांसाठीच नसून प्रौढ व्यक्‍तींसाठीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. आपणा सर्वांनाच काही ना काही कारणांमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागते.

ऑफिस, बसस्टॉप, शाळा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आपण निरनिराळ्या व्यक्‍तींच्या संपर्कात येत असतो, अशा वेळी जर एखादी बाधित व्यक्‍ती तेथे असेल, तर त्या व्यक्‍तीने शिंकताना, खोकताना रुमालाने अटकाव केला नाही, तर हे स्वाइन फ्लूचे विषाणू हवेतफैलावतात; त्याचप्रमाणे दरवाजा मुठी, टेबल टॉप, कड्या, टेलिफोन, संगणकाचा की बोर्ड, माऊस, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये सतत रुळणारा मोबाइल इत्यादी वस्तूंवर काळ जिवंत राहू शकतात. अशा वस्तू निरोगी व्यक्‍तीने हाताळल्यास व तोच हात नाक-तोंड यांच्या संपर्कात आला असता हा विषाणू या निरोगी व्यक्‍तीच्या शरीरात संक्रमण करतो व अशी व्यक्‍तीदेखील बाधित होऊ शकते. यासाठी शारीरिक स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची व आवश्‍यक बाब आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात साबणाने वारंवार, दिवसातून किमान 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवावेत.

सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारी जाणवल्यास स्वच्छ धुतलेला व अन्य कोणीही न वापरलेला रुमाल वापरावा. सार्वजनिक ठिकाणी जाताना, त्याचप्रमाणे इतर वेळीदेखील मास्कचा वापर जरूर करावा. एकच मास्कसुद्धा पुन्हा पुन्हा न वापरता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. असे केल्यामुळे त्यातील विषाणूंमुळे इतरांना बाधा होत नाही. काही कारणाने मास्क उपलब्ध न झाल्यास आपला मोठा हात रुमाल तीन पदरी करून तो नाकावर तोंडावर बांधावा. हाच हातरुमाल पुन्हा वापरण्यापूवी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवावा. शक्‍यतो सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांपासून 2 ते 3 फूट लांब उभे राहून बोलावे.

स्वाइन फ्लू आणि होमिअोपॅथी (भाग २)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)