स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते अवतरणार रूपेरी पडद्यावर

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ढोल-ताशा पथक, भगवे ध्वज, रणशिंग, पारंपरिक लाठी – काठी, शिवकालीन मर्दानी खेळ यांच्या साथीने अवघा परिसर शिवमय झाला होता. यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटील, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते रोहित पवार, आमदार भीमराव तापकीर, दत्तात्रय धनकवडे, अमित गायकवाड अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, महेश हगवणे, न्यूक्लियस सप्लिमेंटचे श्रीपाद चव्हाण, लीड मिडीयाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून २०१९ रोजी होणार आहे. हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही तरडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)