#Foodiesकट्टा : लज्जतदार पदार्थांची “स्वप्नपूर्ती’ 

एक दिवसीय वर्षा विहार म्हटले की, खेड तालुक्‍यातील अनेक ठिकाणे नजरेसमोर येतात. त्यात प्रामुख्याने येते ते भोरगिरी-भीमाशंकर. त्यामुळे येथे कायमच पर्यटकांची वर्दळ असते. या पर्यटकांची खास लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे खास “हॉटेल स्वप्नपूर्ती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट’चे नाव आग्रभागी असून या ठिकाणी कुटुंब व मित्रांसमवेत जेवणाचा आनंद म्हणजेच वेगळाच!


राजगुरूनगर शहरामधून वाडामार्गे भीमाशंकर, भोरगिरीला जाणाऱ्या पर्याटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या नाश्‍ता व जेवणाचा प्रश्‍न पोखरकर बंधूंनी “स्वप्नपूर्ती’च्या माध्यमातून सोडवला आहे. वाडा येथील निसर्गाच्या सानिध्यात हॉटेल “स्वप्नपूर्ती’मध्ये पर्यटकांच्या जिभेला टेस्ट देणारे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. विलास पोखरकर व राजाराम लांडगे यांच्या माध्यमातून या हॉटेलचे व्यवस्थापन केले जात असल्याने आलेल्या नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे ते प्रयत्न करीत आहेत.

प्रसिद्ध पदार्थ : 
मासवडी, मटण, चिकन, चास कमान धरणातील मासे, कोळंबी.
खास पावसाळ्या निमिताने पर्यटकांसाठी या स्वप्नपूर्ती हॉटेलमध्ये खास सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विलास पोखरकर व राजाराम लांडगे यांच्या माध्यमातून या हॉटेलचे व्यवस्थापन केले जात असल्याने आलेल्या नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे ते प्रयत्न करीत आहेत.

पर्यटकांसाठी खास सोयी : 
प्रशस्त पार्किंग, बसण्यासाठी सोय, मोठ्या संख्येने टेबल, महिला पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह, व्हेज-नॉनव्हेज वेगळी व्यवस्था, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. ग्रामीण भागात हे हॉटेल असल्याने येथे पिकणाऱ्या गहू, तांदूळ व भाजीपाला विविध पदार्थांमध्ये वापरल्याने येथील जेवण चवीचे ठरत आहे.

वर्षाविहार केल्यानंतर मनसोक्‍त चवीचे जेवण खाण्यासाठी हॉटेल स्वप्नपूर्ती सज्ज आहे. पर्यटक व प्रवाशांना जेवणासाठी सोयीचे ठिकाण बनले आहे. अगदी माफक दर, अंतर्गत स्वच्छता, मुबलक कर्मचारी, तत्पर सेवा आणि स्वादिष्ट जेवण असे या हॉटेलचे वैशिष्ट्य असून आलेल्या पर्यटकांसाठी जेवणाची उत्तम सोय आहे. शहरातून आलेल्या नागरिकांना हे सोयीचे ठिकाण बनले आहे.
– मनोहर पोखरकर, मालक, हॉटेल स्वप्नपूर्ती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)