स्वामीनारायण मंदिराच्या पुजाऱ्याला बलात्कार प्रकरणात अटक 

सुरत  – येथील प्रख्यात स्वामीनारायण मंदिराच्या पुजाऱ्याला एका 20 वर्षीय तरूणीवर दोनदा बलात्कार केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीच्या आईला शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्याच्या बहाण्याने त्याने तिला फसवले आणि दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला असे हे प्रकरण आहे. निकुंज उर्फ करण स्वरूपदास बाबुभाई सवानी असे अटक करण्यात आलेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो 24 वर्षीय आहे.

दाभोली येथील स्वामीनारायण मंदिराजवळी एका खोलीतच त्याने हे कृत्य केल्याचे पीडित मुलीचे म्हणणे आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकीही त्याने दिली आहे. सदर पुजाऱ्याने या मुलीच्या आईला शस्त्रक्रियेसाठी मान्य केलेले पैसे तर दिलेच नाहीत उलट त्याने तिच्यावर हे अत्याचार केले असे तपासात निष्पन्न झाले आहे असे पोलिसांनी सांगितले. या पुजाऱ्याने काल 23 ऑक्‍टोबर रोजी या मुलीला पैसे देण्याच्या बहाण्याने खोलीवर बोलावले होते त्यावेळी त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्यानंतर मुलीने ही बाब आपल्या पालकांना सांगितली त्यानंतर पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून सदर पुजाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)