“स्वामी विवेकानंद’ नाटकाला दिल्लीकरांची दाद 

नवी दिल्ली: विदर्भांतच नव्हे तर सबंध देशात प्रचंड प्रतिसाद मिळालेले नाटक “स्वामी विवेकानंद’चा प्रयोग नुकताच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राधिका क्रियेशन निर्मिंत प्रयोगाला दिल्लीकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
शुभांगी भडभडे लिखीत आणि सारिका पेंडसे दिग्दर्शिंत नाटकाच्या प्रयोग बघण्यासाठी दिल्लीकर प्रेक्षक गुडगाव, नोएडा येथुनही आले होते. तरूणांच्या मनाला प्रभावित करणाया स्वामी विवेकानंदाचे विचार पुन्हा युवा पिढीला मार्गदर्शन करणारे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
याप्रसंगी विदेश सचिव ज्ञानेश्वर मुळे, पुढचे पाऊल संघटनेने अघ्यक्ष प्रफ्रुल पाठक, लेखिका शुभांगी भडभडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वामी विवेकानंदाच्या मुख्य भुमिकेत अनिल पालकर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)