..पण महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

मथुरा – द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा महिलांचा धार्मिक परंपरामध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केले आहे. महिला राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे विधान स्वामी स्वरूपानंद यांनी केले आहे.

स्वामी स्वरूपानंद  यांनी नेपाळ येथील पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी भारतीय विद्वत परिषदेवरही अाक्षेप नोंदवले आहेत. अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे कार्य करत आहे. या पीठाने महिलेला शंकराचार्य बनवल्याबाबत स्वामी स्वरूपानंद यांनी आक्षेप नोंदवला आहे.कोणतीही महिला ही शंकराचार्याच्या पदावर बसू शकत नाही असे खुद्द शंकराचार्यांनीच ठरवलं असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या विधानाचं समर्थन करताना पुढे म्हटले की, महिला राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात. ते पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकतात. मात्र त्या सनातन संस्थेचे प्रतिनिधी असलेले शंकराचार्य बनू शकत नाहीत. धर्माचे पद हे महिलांसाठी नाही, त्यामुळे कमीतकमी धर्माचार्यांना तरी सोडा.

पुढे ते शनि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यामुळे नुकसान होईल असे देखील म्हणाले. त्यांनी म्हटले की शनि मंदिरात महिला प्रवेश देण्यात येत नाही. कारण शनिची दृष्टी स्त्रीवर पडली तर तिला नुकसान होऊ शकते.मात्र स्त्री-पुरूष समानता आधारे महिला देखील शनिची पूजा करू शकतात अस म्हटल जात. पण यामुळे नुकसान होण्यापासून स्त्रीला वाचवणार कोण, असा प्रश्न स्वामी स्वरूपानंद यांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)