जागा वाटपावरून स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा -प्रकाश आवाडे

जागा वाटपावरून स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा -प्रकाश आवाडे

सांगली -सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने सांगली चे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेस कडे रहावी यासाठी कोल्हापुर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे आणि आमदार विश्वजित कदम यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. प्रकाश आवाडे यांनी सांगलीच्या जागेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती शेट्टी यांना केली आहे.सविस्तर वाचा …. https://goo.gl/7Upk5S

Posted by Dainik Prabhat on Friday, 15 March 2019

कोल्हापूर -सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने सांगली चे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेस कडे रहावी यासाठी कोल्हापुर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे आणि आमदार विश्वजित कदम यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. प्रकाश आवाडे यांनी सांगलीच्या जागेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती शेट्टी यांना केली आहे.

सांगली लोकसभेच्या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस मध्ये महत्वाची बैठक आज पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे ,काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली.

या बैठकीत प्रामुख्याने सांगलीच्या जागेबाबत  दोघा नेत्यांच्यात चर्चा झाली. यावेळी आवाडे यांनी सांगलीच्या जागेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती शेट्टी यांना केली आहे. यावेळी दोघांच्या मध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आवाडे यांनी दिली आहे. या संदर्भात उद्या निर्णय होणं अपेक्षित असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कालच राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आज जाहीर केली होती. यामध्ये हातकणंगले लोकसभाची जागा स्वाभीमानी संघटनेसाठी जाहीर करण्यात आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)