स्वाभिमानी संघटना ‘बॅट’ घेऊन उतरणार निवडणूक रिंगणात

पुणे – खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी “बॅट’ हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खा. शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना “बॅट’ घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला “बॅट” हे चिन्ह अधिकृत केले आहे. ज्या ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी “बॅट’ हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटींग करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)