नगर दक्षिणमधून सुजय विखेंची मुसंडी

नगर – तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील नगर दक्षिण व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक निकालाची घटिका आता समिप आल्याने उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात शिर्डीपेक्षा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मतमोजणीची सुरुवातीची आकडेवारी निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आली असून सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे 221466 मतांसह आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप 133462 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)