नवी दिल्ली – सुझुकी मोटर कार्पोरेशनने आगामी वर्षात नफ्यामध्ये केवळ 1.7 टक्के वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतातील अनिश्चित आर्थिक परिस्थिती आणि राज्याकडून वाढविण्यात आलेला विक्रीकर यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सरलेल्या वर्षातही कंपनीच्या नफ्यात 13.3 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र विक्रीत तीन टक्क्यांनी वाढ झाली होती. आगामी काळात अनिश्चित परिस्थिती असल्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.