सुवेंद्र गांधींनी नेला अर्ज, तर भोर यांची उमेदवारी दाखल

नगर – नगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना जारी करण्यात आल्याच्या तिसऱ्या दिवशी संजीव बबन भोर या उमेदवाराने त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. आज तिसऱ्या दिवशी एकूण 13 जणांनी 15 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. तीन दिवसांत एकूण 57 जणांनी 89 इतके अर्ज नेले आहेत. सुवेंद्र गांधी यांच्यासाठी त्यांचे समर्थ क अविनाश साखला यांनी दोन अर्ज नेले आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे ः (कंसात अर्जांची संख्या) – मयुर सुनील कांगणे (रा.सुडके मळा, ता. नगर, अर्ज एक), सुभाष बन्सी आल्हाट (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर, अर्ज एक), अविनाश सुभाष साखला यांनी सुवेंद्र गांधी यांच्यासाठी दोन अर्ज नेले आहेत. रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (रा. कुकाणा, ता. नेवासा, एक अर्ज), संदीप लक्ष्मण सकट (रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, नगर, एक अर्ज), उदय विलासराव बुधवंत (रा. नांदुरविहिरे, ता. शेवगाव, एक अर्ज), संजय दगडू सावंत (रा. श्रीगोंदे, एक अर्ज), सुनील सॅम्युअल व्हेनॉन (रा. गोविंदपुरा, नगर, एक अर्ज), अशोक दामोदर ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी, एक अर्ज), प्रसाद मधुकर गाडे (रा. राहुरी, दोन अर्ज), प्रसाद मधुकर गाडे यांनी श्रीरामपूरमधील सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांच्यासाठी एक अर्ज नेला आहे. संदीप भीमराज मोहारे (रा. कोरेगाव, ता.नगर, एक अर्ज), राजेंद्र शंकर करंदीकर यांनी श्रीगोंद्यांतील संजय दगडू सावंत यांच्यासाठी एक अर्ज नेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)