शाश्‍वत व पर्यावरणपुरक शेती ही काळाजी गरज

राहुरी विद्यापीठ: आपल्या देशात शेती व पशुधनाचे उत्पादन भरपूर होते. परंतु शेतकऱ्यांच्या हातात त्याचे पुरेसे उत्पन्न त्याला मिळत नाही. शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेच्या निविष्ठा वेळेवर मिळणे, वेळेबाबतचे व्यवस्थापन काटेकोरपणे अमलात आणणे, कीड व रोगांच्या उपाययोजना तत्परतेने होणे गरजेचे आहे. हे सर्व करत असतांना शाश्‍वत व पर्यावरणपुरक शेती करणे ही काळाची गरज आहे.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध झाले. परंतु काही दिवसातच पीक पध्दतीच्या चुकीच्या आयोजनामुळे तलावातील साठलेले पाणी लवकरच संपले. त्यामुळे काटेकोर शेती पध्दतीचा वापर, मृद आरोग्य पत्रिका, माती तपासणी करुन खतांचा वापर ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन नवी दिल्लीच्या कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी विश्‍वनाथा होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए. एस. धवन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस.डी. सावंत, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, डॉ. प्रकाश तुलबतमठ, डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव सोपान कासार, विजय कोते, अभियंता मिलिंद ढोके, समन्वयक अधिकारी डॉ. विठ्ठलराव शेंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)