हल्ला सेलिब्रेट करणारे चौघे निलंबीत 

जयपुर  – काश्‍मीरात पुलवामा येथे सुरक्षा जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून जल्लोष करणाऱ्या काश्‍मीरातील चार विद्यार्थ्यांना निलंबीत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे विद्यार्थी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये शिकत होते. तलवीन मंझुर, इक्रा, जोहरा नाझीर आणि उझमा नाझीर अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत.

त्यांनी व्हॉटसऍप वर या सेलिब्रेशनची छायाचित्रे आणि काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या त्यावरूनही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कृत्याची माहिती मिळताच तणाव निर्माण झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर ही कारवाई केली. अलिगड मुस्लिम विद्यापीठातल्याही काश्‍मीरी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारचे कृत्य केल्याने त्यांच्यावरही तेथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)