मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांचा संप 

मुंबई – मुंबईत आज सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्व 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी निर्माण झाली आहे. कामबंद असल्याने मुंबईत आज कोणीही कचरा उचललेला नाही. महापालिकेने कचरा उचलण्यासाठी नव्या कंपनीला कंत्राट दिले आहे. यामुळे कायम आणि कंत्राटवर असलेले सफाई कामगार नाराज आहेत. कारण त्यांची बदली नव्या वॉर्डमध्ये केली जात आहे. महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणती दखल न घेतल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासून कांदीवली, बोरिवली आणि दहिसरमधी सफाई कर्मचा-यांनीही संप पुकारला होता. आता सगळ्या 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी झाली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास उद्यापासून बीएमसीचे सर्व विभाग या आंदोलनात सहभागी होती, असा इशारा कामगारांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)