सस्पेन्स अखेर संपला; प्रियंका गांधी नव्हे तर ‘हे’ लढणार मोदींविरोधात 

रायबरेली – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा या उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसने आज नरेंद्र मोदींविरोधात अजय राय याना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मधुसूदन तिवारी याना गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी-वढेरा या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तविण्यात येत आहे. मध्यंतरी स्वतः प्रियंका यांनी देखील आपण वाराणसीतून निवडणूक लढवल्यास त्यात काय गैर आहे? असा प्रश्न उपस्थित करत वाराणसीतून निवडणूक लढवण्याबाबत आपण उत्सुक असल्याचेच दर्शवले होते.

https://twitter.com/ANI/status/1121308005952360448

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)