आत्महत्येस कारणीभूत महिला सावकारास अटक

मेणवली – सावकारीच्या जाचाला कंटाळून वाई येथील महिला व्यावसायिकेच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना वाई शहरात घडली होती. आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पाचगणी येथील माजी नगरसेवकाच्या घरातील कन्या व शिवसेना महिला पदाधिकारी असणाऱ्या वर्षा उंबरकर हिला वाई पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

मूळ ओझर्डे येथील उद्योजक यशवंत चंद्रराव पिसाळ यांचा वाई पोलिस ठाण्याच्या आवारात भक्ती वुलन नावाचा श्वेटरचा कारखाना आहे. नुकताच महाराष्ट्‌‌‌ शासनाच्यावतीने त्यांच्या पत्नीला यशस्वी उद्योजिकता पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. पिसाळ यांनी 1 फेब्रुवारी रोजी खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून राहात्या घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली होती हे त्यांच्या फोन कॉलवरून सिद्ध झाल्यावर त्यांच्या पत्नीने खाजगी सावकार वर्षा उंबरकर विरोधात वाई पोलिसात लेखी तक्रार केली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती पाचगणी येथील शिवसेनेची जबाबदार पदाधिकारी तसेच एक जबाबदार नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या घरातील कन्या वर्षा अरुण उंबरकर हिच्याकडून पिसाळ यांनी त्यांच्या व्यवसायासाठी एक वर्षापूर्वी दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. पिसाळ यांनी व्याजाने घेतलेली रक्कम व्याजासकट चेकने परतफेड केली होती. परंतु, वर्षा उंबरकर गेले काही दिवस रक्कमेच्या व्याजासाठी पिसाळ यांना फोन करून धमक्‍या देत होत्या, तसेच कारखान्यात गुंड पाठवून मशीन उचलून नेण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला होता. पिसाळ यांनी विनवण्या करूनही उंबरकरानी पैशासाठी तगादा चालूच ठेवला होता.|

आत्महत्येपूर्वी वर्षा उंबरकरने पिसाळ यांना मशीनरी व बायको उचलून नेण्याची फोनवरून धमकी दिली होती. उंबरकर यांच्या धमकीच्या फोन नंतर पिसाळ यांनी काही वेळातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. यानिमित्ताने सावकारी धंद्यात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने वाई व पाचगणी परिसरात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. खाजगी सावकारी करणे कायद्याने गुन्हा असताना वर्षा उंबरकर यांच्यामुळे पिसाळ यांना जीव गमवावा लागल्याने वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सपोनि निबाळकर, पीएसआय राजेंद्र कदम, सहाय्यक फौजदार रवींद्र यादव, कृष्णा पवार यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून सखोल तपास करत सापळा रचून गुन्हेगार ताब्यात घेतला. दरम्यान आज आरोपीला वाई न्यायाल्यात हजर केले असता न्यायाल्याने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)