सुष्मिता सेन-रोहमनचा ब्रेकअप नाही

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची लव्ह लाईफ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की सुष्मिताचे तिचा बॉयफ्रेंड रोहमनशी ब्रेकअप झाले मात्र आता सुष्मिताच्या या नव्या फोटोमुळे या अफवांना ब्रेक लागला आहे. सुष्मिताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक जिम मधला फोटो शेअर केला आहे यात ती आपला बॉयफ्रेंड रोहमनसोबत आहे.

यात सुष्मिता ब्लॅक कलरचे कपडे घातले आहेत. तर रोहमन व्हाईट वेस्ट आणि ब्लॅक टाईट्‌समध्ये पोज देत आहे. इतकेच नव्हे तर सुष्मिताने या फोटोसोबत कॅप्शनही दिले आहे रोहमन आय लव्ह यू. यावर रोहमनने कमेंट करताना म्हटले आहे की यस शी इज माईन तसेच यासोबत त्याने हार्ट इमोजीही टाकला आहे.

याआधी रोहमनने आफल्या इन्स्टास्टोरीमध्ये काही मेसेजेस लिहिले होते यात त्याने कोणाचे नाव घेतले नव्हते मात्र ते पाहून सुष्मिता आणि त्याचे ब्रेकअपच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. मात्र आता हे वृत्त केवळ अफवास असल्याचे समोर आले आहे आणि दोघांमध्ये सर्व काही सुरळीत आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिताचा भाऊ राजीव सेनचे गोव्यात लग्न झाले. यात रोहमनही सहभागी झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)