सुष्मिताच्या डोक्‍यावर पुन्हा “मिस युनिव्हर्स’चा ताज

25 वर्षांपूर्वी 21 मे रोजी फिलीपाईन्समध्ये झालेल्या “मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सुष्मिता सेन विजयी झाली होती. त्या घटनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद सुष्मिताच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा साजरा केला आहे. या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून सुष्मिताला हा “मिस युनिव्हर्स’चा ताज पुन्हा एकदा चढवला गेला. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सुष्मिताने इन्स्टाग्रामवरच्या आपल्या अकाउंटवर अपलोड केले आहेत. या फोटोंबरोबर सुष्मिताने फारच सुंदर पोस्टही लिहीली आहे.

हा प्रवास खूपच अद्‌भुत होता. मला माझ्या मातृभूमीला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मी भारतीय म्हणून या पृथ्वीवर आले याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. “मिस युनिव्हर्स’ साठी 41 वेळा ही स्पर्धा होऊन गेली होती. पण सुष्मिताच्या आगोदर हा किताब कोणत्याही भारतीय सौंदर्यवतीला मिळाला नव्हता. त्यामुळे हा आनंद अवर्णनीय होता. या आनंदाच्या पुनप्रत्ययाचा आनंदही तितकाच मोलाचा आहे, असे सुष्मिताने म्हटले आहे.

तिच्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी दिलेले हे सरप्राईज खूपच अनोखे होते. तिने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंड रोहमन शॉल, प्रितम शिखरे, नुपूर शिखरे यांच्या बरोबर अलीशा आणि रैनी या दोन्ही कन्याही दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)