सुषमा स्वराज आणि पाकिस्तानच्या मंत्र्यामध्ये ‘तू तू मै मै’

इस्लामाबाद – पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने निकाह लावून देण्याच्या घटनेवरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकच्या मंत्र्यामध्ये ट्‌विटरवर शाब्दिक खडाजंगी झाली.

या अपहरण आणि धर्मांतराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर सुषमा स्वरज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्‍तालयाकडून या संदर्भातील अहवाल मागवला. स्वराज यांनी ट्‌विटरवर संबंधित घटनेचे वृत्तही टॅग केले आणि आपण अहवाल मागवल्याचे म्हटले. त्यावर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी स्वराज यांच्या ट्‌विटला “हा आमच्या देशामधील अंतर्गत मामला आहे.’ असे उत्तर दिले.

त्यावर संतापलेल्या सुषमा स्वराज यांनी खरमरीत शब्दात फवाद चौधरी यांना उत्तर दिले. दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने करण्यात आलेल्या धर्मांतरासंदर्भात आपण केवळ इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्‍ताल्याकडून अहवाल मागवला आहे. केवळ यामुळे तुम्ही विचित्र वागत आहात. ही तर तुमच्या अपराधीपणाची बोच मनाला डाचत असल्याचे निदर्शक आहे, असे स्वराज म्हणाल्या.

त्यावर चौधरी यांनी पुन्हा स्वराज यांना प्रत्त्युत्तर दिले. अल्पसंख्यांकांची काळजी करणारे लोक भारतीय प्रशासनामध्ये आहेत, ही आनंदाची बाब आहे. गुजरात आणि जम्मूमधील अल्पसंख्य समुदायाचीही काळजी करावी, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)