केंद्र सरकारची आसाममधील ‘ती’ कृती घटनाबाह्य – सुशीलकुमार शिंदे

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विषय उकरून काढल्याचा आरोप

पुणे – खातरजमा न करता केंद्र शासनाने तब्बल 40 लाख नागरिकांना अवैध ठरविले आहे, केंद्र शासनाची ही कृती घटनाबाह्य असून नागरिकत्वावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. देशाला संपूर्ण हिंदू बनविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, भारत हा सर्व जाती-धर्मांचा देश असल्याने त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होउ शकला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केंद्र शासनाने हा विषय उकरुन काढला आहे, असा आरोप करुन शिंदे म्हणाले, त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने थातूर-मातूर कारणे देण्याचा उद्योग सुरू करण्यात आला आहे. वास्तविक ही प्रक्रिया राबविताना ती अधिक पारदर्शी आणि सुटसुटीतपणे राबविण्याची आवश्‍यकता होती. मात्र, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हा खटाटोप सुरू करण्यात आला आहे, त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)