सुशांतने साराला सोशल मीडियावर केले अनफॉलो?

बॉलीवूडमधील हॉट कपल सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, सुशांतने सोशल मीडियावर सारा अली खानला अनफॉलो केले आहे. सुशांत आणि साराच्या चाहत्यांसाठी ही आर्श्‍चयाची बाब मानली जात आहे. कारण सुशांतच्या लिस्टमध्ये साराचे नावच नाही. पण त्यानंतरही सारा ही सुशांतला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.

सुशांतने साराला अनफॉलो करत इंस्टाग्राम अकाउंटवरून सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही सुशांतने आपल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यामुळे सुशांत आणि सारा यांच्या रिलेशनशिपमध्ये तणाव असल्याची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुशांतचा “सोनचिडिया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात त्याच्यासोबत भूमि पेडणेकर झळकली होती. दुसरीकडे बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरलेल्या “सिंबा’ चित्रपटात सारा अली खान ही रणवीर सिंहसोबत झळकली होती. तसेच सारा सध्या कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)