सुरवीन चावला आई झाली

“हेट स्टोरी 2′ आणि “पार्च्ड’ या दोन सिनेमांमधील शानदार अभिनयाबरोबर “सॅक्रीड गेम्स’ सारख्या धमाकेदार वेबसिरीजमधील मस्त परफॉर्मन्सद्वारे लोकांच्या लक्षात राहिलेली सुरवीन चावला आई झाली आहे. सुरवीनने 15 एप्रिलला एका छोट्या परीला जन्म दिला आहे. सुरवीनने एका मॅगझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये ही बातमी दिली. मुलीच्या जन्मानंतर आता आपल्याला कसे वाटते आहे, हे आपण शब्दात सांगू शकत नाही. हा एक अनोखा अनुभव आहे. परमेश्‍वराची आमच्या कुटुंबावर विशेष कृपा झाली आहे, असे वाटते आहे, असे सुरवीन म्हणाली.

सुरवीन आणि तिच्या पतीने त्यांच्या मुलीचे नाव ईव असे ठेवले आहे. तिने आपल्या मुलीचा एक क्‍युट फोटोही सोशल मिडीयावर शेअर केला आहे. सतत ऍक्‍टिव्ह असलेली सुरवीन प्रेग्नन्सीच्या काळातही खूप ऍक्‍टिव्ह होती. या काळात ती सगळ्या इव्हेन्ट्‌सला हजर रहायची. त्याकाळात बेबी बंपसह तिने फोटो शेअर केलेले असल्यामुळे तिच्याकडे “गुड न्यूज’ आहे हे सगळ्यांन माहिती झाले होते.

सुरवीन चावलाने 2015 साली अक्षय ठाकरबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. एकता कपूरच्या “कहीं तो होगा’ सिरीयलमधून सुरवीनने आपल्या ऍक्‍टिंग करिअरला सुरुवात केली होती. “कसौटी जिंदगी की’मध्येही तिने प्रेरणा आणि मिस्टर बजाजच्या मुलीचा रोल साकारला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)