सर्जिकल स्ट्राईकने भारताचे नवे धोरण दाखवले : मोदी

श्रीनगर : केंद्र सरकार दहशतवादाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढेल. प्रत्येक दहशतवाद्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकने जगाला भारताचे दहशतवादाविरोधातील नवे धोरण दाखवून दिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले.

येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी दहशतवादाचा फैलाव करून निष्पाप युवकांची हत्या करणाऱ्यांना कठोर इशारा दिला. जम्मू-काश्‍मीरमध्ये आम्ही दहशतवादाचे कंबरडे मोडून काढू. निष्पाप आणि नि:शस्त्र काश्‍मीरी युवकांच्या हत्येच्या घटनांमुळे संपूर्ण देश संतप्त आहे. स्वप्नपूर्तीसाठी जगत असल्याने काश्‍मीरी युवकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाते. स्वप्नपूर्तीसाठी जगणारे खरे नायक आहेत. तर दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे मोठे भ्याड आहेत, असे ते म्हणाले.

सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून काश्‍मीरमधील शांतता आणि विकासासाठी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आम्ही प्रयत्न करू. जम्मू-काश्‍मीरचा विकास केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे. काश्‍मीरी युवकांसाठी रोजगार संधी वाढवण्यावर आमचा भर आहे, अशी ग्वाहीही मोदींनी यावेळी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)