सुरेश रैनाच्या आयपीएलमधे 5 हजार धावा

चेन्नई – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा पराभव करत आगेकूच नोंदवत अनेक विक्रम आपल्या नावे केले. ज्यात सुरेश रैनाने आयपीएलमधे सर्वात जास्त धावा करण्याचा तसेच या स्पर्धेत 5 हजार धावा करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.

आरसीबीच्या 70 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रैनाने आपली 14 वी धावा काढली आणि आयपीएलमधील 5 हजार धावा पुर्ण केल्या. रैनाने 177 सामन्यात 34.38च्या सरासरीने आणि 138. 43 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार धावा केल्या. विराट कोहली सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता कोहली रैनाला पाठीमागे टाकत पहिल्यांदा आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करेल असा कयास लावला जात होता. त्यातच आरसीबीला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाल्याने ही शक्‍यता वाढली होती.

पण, विराटला यासाठी 46 धावांची गरज होती. पण, त्याला 6 धावाच करता आल्या. यावेळी रैनाला 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 14 धावांची गरज होती. त्याने 21 चेंडूत 19 धावांची खेळी करत आपल्या आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)