नवी दिल्ली: केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच विभागवार निर्यात प्रोत्साहन धोरणाचा आढावा घेतला. सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांनी आपापल्या क्षेत्रासाठीचा हा आढावा तयार केला आहे. निर्यात क्षेत्रात जवाहीरे आणि दागिने, चामड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग आणि तयार कपडे, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, औषधे, कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच सागरी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर उद्योग मंत्रालयाने भर दिला आहे. विभागवार निर्यात प्रोत्साहन धोरणाची ही तिसरी आंतरमंत्रालयीन बैठक होती. विविध विभागांचे सचिव आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला.
निर्यात धोरणात समन्वय राखण्यासाठी सर्व खाती मिळून काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. निर्यातीसाठी दक्षिण आशियाई देशांवर अधिक भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली. आशियाई प्रदेशातल्या काही देशांसोबत वस्तूंची निर्यात आणि देवघेवही केली जाऊ शकेल असे ते म्हणाले. भारतात कामगार प्रणित विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यावर सरकारचा भर आहे असे ते म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0