सुरत – गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आगीप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाने दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासचे मालक भार्गव भूटानी याना अटक केली आहे. याशिवाय इमारतीत बेकायदेशीररित्या तिसरा मजला बांधणारे हर्सुल वेकारिया आणि जिग्नेश बागदारा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून लवकरच अटक करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातील तात्काळ सर्व ट्युशन क्लासेस बंद करण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतरच क्लासेस पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, राजकोट, वड़ोदरामधील कोचिंग क्लासेसचे सेफ्टी ऑडिट पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
Satish Sharma, Commissioner of Police Surat: Have arrested the man who used to conduct the tuition classes. #SuratFire #Gujarat pic.twitter.com/eAmGFlAhGt
— ANI (@ANI) May 25, 2019
Satish Sharma, Commissioner of Police Surat: All type of tuition classes have been stopped for now, classes can only be conducted after the required fire safety checks are done & a fire safety certificate has been obtained. #Gujarat https://t.co/eaWLDD2hL8
— ANI (@ANI) May 25, 2019
दरम्यान, तक्षशिला इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २० विद्यार्थ्यांचा झाला आहे. तर २० जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.