काकडेंचे आकडे ! सुप्रिया सुळे होणार पराभूत तर महायुतीला मिळणार १० जागा !

पश्चिम महाराष्ट्रातल्या दहा जागा महायुती जिंकणार! ; सुप्रिया सुळे एक लाख मताधिक्याने पराभूत होतील

पुणे: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीला २ आठवडे बाकी असताना भविष्यवाणी सांगितली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, त्यांनी पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.

तसेच गिरीश बापट साहेब आणि माझ्यात मतभेद नाहीत. इच्छुक अनेकजण असतात मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचं काम करायचं असतं. हा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे मी पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे, असे काकडेंनी स्पष्ट केले.

संजय काकडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला निश्चितपणे हादरा बसेल अशी परिस्थिती सध्या आहे. बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मताधिक्याने पराभव होईल.

ते समोर म्हणाले, महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला सुमारे 4 लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता तर, आघाडीच्या सभेला अल्पसा प्रतिसाद होता. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा मैदानावर व्हायच्या. शरद पवार साहेब व पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे झालेली प्रचाराच्या शुभारंभाची सभा एका चौकात घ्यावी लागली. यावरुनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनाधार संपला असून भाजप-शिवसेना महायुतीला मोठा जनाधार प्राप्त झाल्याचे दिसून येते. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आमची ताकद आणखी वाढत आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत महायुतीचे चित्र आणखी चांगले झालेले दिसेल आणि यातूनच विजयाची खात्री येते.

बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदार संघातून भाजपला आघाडी मिळेल व किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे आणि त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार आहे. भाजपचे उमेदवार गिरीश बापट साहेब आज सकाळी भेटीसाठी आले होते. प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून प्रचारात मी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)