सुप्रिया सुळेंनी चैत्यभूमीवर घेतली प्रकाश आंबेडकरांची सदिच्छा भेट

मुंबई : आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. महामानवास आदरांजली वाहण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील आज सकाळपासूनच चैत्यभूमीवर उपस्थिती लावली होती.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सकाळपासूनच अंजलीताई आणि बाळासाहेब आंबेडकरांनी चैत्यभूमीवर उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर आल्या असता त्यांनी बाळासाहेब आणि अंजलीताई यांची सदिच्छा भेट घेतली. याबाबत सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून माहिती देताना बाळासाहेब आणि अंजलीताई यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

-Ads-

यावेळी सुळे यांनी चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरवादी जनतेशी देखील संवाद साधला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
237 :thumbsup: Thumbs up
165 :heart: Love
8 :joy: Joy
16 :heart_eyes: Awesome
16 :blush: Great
8 :cry: Sad
17 :rage: Angry

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)