सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या सर्व खासदारांना आवाहन

मुंबई: महाराष्ट्र सरकारने महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव भारतरत्नसाठी केंद्र सरकारकडे पाठवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. “सामाजिक सुधारणा घडविणाऱ्या या दाम्पत्यास भारतरत्न जाहीर व्हावा, अशी आग्रही मागणी मी संसदेतही केली होती. आता नरेंद्र मोदींनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, ” अशी विनंती सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या सर्व खासदारांना राज्य सरकारने पाठविलेल्या या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, राज्य सरकारने पाठविलेल्या या प्रस्तावाचा पाठपुरावा आपण सर्वजण मिळून करु. ही एक अशी बाब आहे की त्यासाठी पक्षभेद, मतभेद हे सगळे बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)