पाकिस्तानात ईशनिंदा प्रकरणी फेरसुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

इस्लामाबाद : पाकिस्तानात आसिया बिबी या ख्रिश्‍चन महिलेविरोधातील ईशनिंदेच्या प्रकरणाची फेरसुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे तेथील कट्टरवादी गटांना मोठा धक्का बसला आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली आसिया बिबीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या कट्टरवादी गटांकडून केली जात होती.

आसिया बिबीला 2010 साली ईशनिंदेच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. शेजाऱ्यांबरोबरच्या भांडणादरम्यान तिने ईशनिंदा केल्याचा तिच्यावर आरोप होता. गेली 8 वर्षे आसिया बिबी तुरुंगात होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तिला दोषी ठरवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. त्यामुळे देशभर हिंसक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आसिया बिबी आणि तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्‍याही मिळायला लागल्या होत्या. तिच्या खटल्याची फेरसुनावणी करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली होती. सरन्यायाधीश आसिफ सय्यद खोसा यांनी ही याचिका फेटाळून लावली. पूर्वीच्या निकालातील त्रुटी दाखवण्यात याचिकाकर्त्यांना यश आले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)